तुझी आणि माझी मैत्री

तुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी

तुझी आणि माझी मैत्री
ऊन्ह आणि सावली जणु
सतत सोबत असताना
साथ न सोडणारी

तुझी आणि माझी मैत्री
मन आणि भावना जणु
मी न बोलताही
सगळे समजुन घेणारी

तुझी आणि माझी मैत्री
गीत आणि सुर जणु
मधुर शब्दांच्या साथीने
जीवन सुंदर करणारी

– योगेश खजानदार

Advertisements

गुरु

असत्य से सत्य तक
पाप से पुण्य तक
राह जो दिखायें
वह गुरु कहलाये

स्वार्थ से निस्वार्थ तक
गर्व से नम्रता तक
शिष्य जो बनाये
वह गुरु कहलाये

गलत से सही तक
अधर्म से धर्म तक
बेहतर समाज बनाये
वह गुरु कहलाये
– योगेश खजानदार

आझादी

ये हवा चल मेरे साथ
मुझको खुद में मिला दे
तोडकर सरहदों को
सारी दुनिया घुमा दे

ये रंग जो बेरंग हो
मुझको वो रंग दे
बाट सके ना कोई
वेसे रंग में मिला दे

ये पंछी सुन ये बात
वो चैन मुझे दिला दे
उड जाऊ वो आसमां
वैसी आझादी दिला दे
– योगेश खजानदार

प्रेम आणि तु

प्रेम केलं तरी राग येतो
नाही केलं तरी राग येतो
तुच सांग प्रेम आहे की नाही

पाहील तरी राग येतो
नाही पाहिल म्हणून राग येतो
खर सांग चोरुन पाहतेस की नाही

मी नाही भेटलो म्हणुन चिडतेस
ऊशीर झाला म्हणून चिडतेस
मी येण्याची वाट पाहतेस की नाही

सारख माझ्यावर चिडतेस
हळुच माझ्या जवळ येतेस
माझ्या विरहात रडतेस की नाही

प्रेम आहे लपवतेस
डोळ्यात तुझ्या हे दिसते
सांग खरंच प्रेम आहे की नाही
– योगेश खजानदार

एकांत

हवी होती साथ
पण सोबती कोण
वाट पाहुनी
शेवटी एकांत

डोळ्यात अश्रु
का केला हट्ट
मनी प्रश्न
शेवटी एकांत

सोबती आज
आठवणींचे गीत
मन आज गाते
शेवटी एकांत
– योगेश खजानदार

राख

सांभाळला तो पैसा
न जपली ती नाती
स्वार्थ आणि अहंकार
ठणकावून बोलती
निकामी तो पैसा
शब्द हेच सोबती
आपुलेच सर्व
पैशावरी मोजती
ती शेवटची घटका
मझ आस न कोणती
राख या शरीराची
शेवट रिकामेच हाती
का केला हट्ट
जीवन हे खर्ची
राखेवरी आपुले
पैशासाठी भांडती
-योगेश खजानदार

पुन्हा प्रेम

भिती वाटते आज
पुन्हा प्रेम करायला
मोडलेले ह्रदय
परत जोडायला
नको येऊस पुन्हा
मझ सावरायला
न राहीले हे मन
आता प्रेम करायला
आहे मीच एकटा
स्वतः सावरायला
तुझी आठवण मझ
आहे साथ द्यायला

भिती वाटते आज
पुन्हा प्रेम करायला..