पांथस्थ…!!

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची
त्या सावलीतला मी एक पांथस्थ
हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी
पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज

कधी भेटे कोणी ,कधी मी हरवूनी
माणसातला मी उरतो इथे फक्त
वेगळे वेष दिसूनी, वेगळी भाषा बोलूनी
आठवणींचा पसारा राहतो आहे एक

कित्येक पावले चालूनी, एकांती स्वतः स भेटूनी
रात्रितल्या चांदण्या ओळखतात मला फक्त
थकतात पावले दोन्ही, डोळ्यात आहे पाणी
मागे वळून पाहताना होतात मग ते व्यक्त

खचते मन जेव्हा, पावले अबोल राहतात तेव्हा
पुढच्या वाटेस दोष देत, भांडतात तेव्हा ते शब्द
तरी चालतं जाताना, नव्या वाटेस भेटताना
विसरून जाते मन लगेच ते सारे दुःख

हा प्रवास माझा असा, सांगावा तरी कसा
वाटा बोलतात आणि मी ऐकतो त्यास फक्त
जणू चालत राहावे , अनुभव घेत राहावे
कारण, त्या सावलितला मी एक पांथस्थ
✍ योगेश खजानदार

Advertisements

Happy makar Sankranti!!! 😊

मित्रानो आपलं नात असच गोड रहाव …

मकर संक्रांती!!!!

आपलं नात छान असावं
तिळगुळा सारखं गोड असावं
रुसव्याला तिथे स्थान नसावं
आनंदाचं इथे घर असावं

आपलं नात अबोल नसावं
गुळात मिळालेला गोडवा असावं
तिळगुळ खाऊन मस्त असावं
फक्त गोड शब्दांचे मोती असावं

आपलं नात एक आठवण असावं
ओठांवरच हास्य असावं
अतूट एक बंधन असावं
कधीही न विसरण्या चे वचन असावं
✍ योगेश खजानदार

माझ्या सर्व गोड, तिखट , रागीट , नम्र , बोलक्या , अबोल मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमचं आणि माझ हे मैत्रीचं नातं असच आयुष्यभर गोड रहाव !!!! 😊😊😊

माणूस म्हणुन…!!!

शोधायचं आहे आज
माझेच एकदा मला
कधी कोणत्या वळणावर
भेटायचं आहे मला

कधी अनोळखी होऊन
विचारायचं आहे मला
कधी हरवलेल्या विचारात
पहायचं आहे मला

नसेल चिंता कशाची
मुक्त फिरायच आहे मला
बांधलेल्या हातास आता
सोडायचं आहे मला

आपल्यात आपण, सगळ्यात सगळे
अस्तित्व पाहायचे आहे मला
वेगळं होऊन या दुनियेत
जगायचं आहे मला

मी ,माझा , माझ्यात मीच
कोण आहे बघायचं आहे मला
कधी स्वतःस भेटून एकदा
विचारायचं आहे मला

उधळून, फेकून, जाळून ही
ही लखतर फेकायची आहेत मला
माणूस म्हणून या जन्मात
जगायचं आहे मला

हो !!माणूस म्हणून या जन्मात
जगायचं आहे मला !!!
✍योगेश खजानदार

अबोल राहून…!!

“अबोल राहून खूप काही बोलताना तिच्याकडे फक्त बघतच रहावं तिच्या प्रत्येक नखऱ्याला डोळ्यात फक्त साठवून घ्यावं नसावी कसली भीती तिला तिच्यासारखं आपणही बिंधास्त रहावं अल्लड प्रेमाची भावना समजून घेताना उगाच आपणही हरवून जावं ओढ असावी ही मनात तिच्या तिने ते नजरेत बोलून दाखवावं मी मात्र उगाच शोधताना मनात माझ्या तिला पहावं असे हे नाते मनाचे नेहमीच नव्याने तिने फुलवाव कधी हसू कधी रडु पण सतत माझ्या सोबत रहाव कितीदा भेटाव तिला तरी पुन्हा पुन्हा त्या वाटेवर जावं तिच्या येण्याकडे तेव्हा नजर लावून पहात रहावं…!!” ✍योगेश खजानदार

सुर्यास्त (कथा अंतीम भाग)

सतत सोबत हवी वाटणारी व्यक्ती आता नकोशी का वाटावी. कदाचित नात आता उरलेच न्हवते. उरल्या होत्या फक्त समज गैरसमज याच्या वाईट आठवणीं. मी कदाचित चुकलो असेन पण माझं प्रेम आजही तसच आहे. कदाचित समीर आणि सायलीच मन हेच बोलत असेल. समीर आता जाण्यासाठी तयार झाला होता. सायलीला त्याने जाऊ नये असच वाटत होत. कित्येक दिवस एकमेकांना एका शब्दानेही ते बोलले न्हवते.
“समीर , तुझ्याशी बोलायचं आहे थोड!!” समीरची आई समीरकडे पहात म्हणाली.
“काय आई !! बोलणं!!! ”
“कित्येक दिवस झाले मी एक गोष्ट पाहतेय !! तू सायालीशी काहीच बोलत नाहीस , ती आली की निघून जातोस !! भांडणं झाल का तुमचं ??” आईच्या या अनपेक्षित प्रश्नाने समीर गोंधळून गेला.
“नाही आई , काहीच नाही झाल !! ”
“मग मध्ये तिच्या वाढदिवसाला पण नाहीस आला!!काय झालंय का मला सांग !! ”
“आई ,कित्येक गोष्टी मला नाहीत पटत, माझ्या प्रत्येक गोष्टीत मी तिला जवळ केलं पण ती मलां काहीच सांगत नाही!! ”
“समीर नात्यांमध्ये कोणी काही सांगावं याच बंधन नसतं !! तुझ्या वहीतली एकही कविता तू जिच्यासाठी लिहिली तिला सांगितली नाहीस!!पण तिच्या नजरेत तुला आपल करण्याची ओढ कधी दिसलीच नाही!! समीर मी आई आहे तुझी !! त्या दिवशी सायली समोरून गेल्यावर तू कविता म्हणाला होतास तेव्हाच मी तुझ्या नजरेत तिच्याबद्दल प्रेम वाचलं होत!!” समीरची आई समीरला सगळं काही मनातल सांगत होती.
“तू तिला बोलला नाहीस !! पण तुलां ती तिच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी बोलवायला आली !! ”
“पण आई तिला मला बोलायचं नाही आता !! आणि मीही नाही बोलणार तिला !! ” समीर आईकडे पाहत म्हणाला.
“तिला बोलायचं नाहीये हे तू कस ठरवलं!! सतत काही कारण काढून ती माझ्याकडे येते पण तिला तुला बोलायचं असतं!! आणि तू प्रत्येक वेळी निघून जातोस!!”
समीरला काय बोलावं तेच कळेना तुषार आणि सचिनचं ऐकून आपण मोठी चूक तर केली नाहीना असे त्याला वाटू लागले. तो कित्येक वेळ सायली चा विचार करू लागला. खरंच आपण चुकलो याची जाणीव त्याला झाली होती. कारण आपण सायलीला बोलायला हवं होत, गैरसमजच, विचारांचं चक्र बंद करून टाकते आणि उरतो फक्त अंधार. समीर आता परगावी जाण्यास निघणार होता. या सर्व गोष्टींचा विचार करणं बंद करायचं आणि आपण नव्याने सुरुवात करायची अस त्याने ठरवलं होत.
सगळी तयारी झाली होती. समीरची आई अश्रू अनावर होऊन समीरकडे पाहून रडत होती. ज्याच्याशिवय एक दिवस राहू शकत नाही तो समीर आता तिला सोडून परगावी चालला होता. आईचा आशीर्वाद घेऊन तो बाहेर पडला तसा ,सायली समोरच उभा होती.
“कायमचा निघून चाललास??” सायली अचानक बोलून गेली.
“का??”
“तिकडे नोकरीची संधी आली म्हणून!!” समीर तिच्या डोळ्यात पहात म्हणाला.
“माझ्यापासून दूर जायचं आहे म्हणुन सांग ना सरळ!! मी चांगली मुलगी नाहीये ना म्हणून ना ?? ”
“अस का म्हणतेय सायली !!! तू चांगली मुलगी नाहीस अस मी कधी म्हणालो का ??”
“हो म्हणाला होतास ना !! की मी मागे असते तुझ्या सारखं !! मी वाईट आहे !! ” सायली डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
“तुला वाईट म्हणणं शक्यच नाही!! ”
कित्येक वेळ दोघं एकमेकांशी बोलत होते. सायली आणि समीर यांना आपल्या चुका कळून आल्या होत्या.
भांडले ही दोघे. समीर आता जाण्यास निघाला होता. पण सायली त्याला जाऊच देत न्हवती. गैरसमज किती वाईट असतो हे दोघांना कळून आले होते.
“मग !! जायचं परगावी अजुन !! मला सोडून !!! ” सायली समीरकडे पाहून म्हणताचं.
“नाही जाणार आता !! ”
“छान , आणि आधीच का नाही बोललास तू मला !! किती ते गैरसमज माझ्याबद्दल !! ” आणि यापुढे कोणाचही ऐकायचं नाहीस कळलं!! ”
“हो बाबा कळलं मला !! ” समीर माफी मागत म्हणाला .
“चल संध्याकाळ झाली !! गच्चीवर जायचं नाही का आज ??” सायली मिश्किल हसत म्हणाली.
“तुझी सोबत हवी आज मला तिथे !! ”
दोघेही कित्येक वेळ गच्चीवर बसून तो सुर्यास्त पहात होते. सायलीकडे पाहत समीर म्हणाला.

” “कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे
तुझ्या जाण्याने मझ का
कोणती हुरहूर ती लागे

नसेल तुलाही विरह नको हा
चंद्र ताऱ्यात सोबती तु आहे
कधी सोबती मज कोणी तर
कधी एकांती तुझी सोबत आहे!!

कधी वाटे उगाच का
ओढ मनास ती लागे!!”
“तूच लिहीस आहेस ना ?? ” सायली समीरला विचारू लागली.
“हो !! ”
“माझ्यासाठी?? ”
“नाही !!! तो सुंदर सूर्यास्त होतो ना त्यासाठी!! ” समीर मस्करित सायलीला म्हणाला.
त्या सुंदर सूर्यास्ता मधे समीर आणि सायली कित्येक वेळ गच्चीवर बसून होते. गैरसमज याचा सूर्यास्त केव्हाच झाला होता . उरला होता फक्त सुंदर क्षणाचा सूर्यास्त …. !!!

*समाप्त*

-योगेश खजानदार

सुर्यास्त (कथा भाग -५)

समीर आता कोणाशीच जास्त बोलत न्हवता. सायली आणि त्याच्यामध्ये आता बोलण पूर्ण बंद झाल होत. पण ते नात जे कोमेजून गेलं होत त्याला आता कुठेतरी विसरायचं होत. सायली पण आता समीरकडे जास्त येतं जात न्हवती. इतकं सुंदर नात गैरसमजातून उध्वस्त झाल होत. समीर आता दुसऱ्या गावाला जाण्यासाठी विचार करत होता. कदाचित समोर असलेल्या सायलीला विसरायचं होत.म्हणूनच इथून त्याला बाहेर जायचं होत.
“आई!! मला तुझ्याशी बोलायचं होत थोडं!!” समीर अचानक आईला बोलत म्हणाला.
“बोल ना समीर!! काय झालं!!”
“आई मी परगावी जाण्याचा विचार करतोय नोकरीसाठी!! एका ठिकाणी मला चांगली संधीही चालून आली आहे !!”
“समीर !! अरे तू हे काय म्हणतोय !! परगावी !! या आईला सोडून जावं वाटेनं का रे तुला??” आई डोळ्यात अश्रू पुसत म्हणाली.
आई अशी म्हणताचं समीरला अश्रू अनावर झाले.
“नाही आई !! पण संधी चांगली आहे !! आणि तूही ये ना तिकडेच नंतर !!! ” समीर स्वतःला सावरत म्हणाला.
” अरे !!पण जावच लागेल का??”
“हो आई!! संधी चांगली आहे !!! ”
“तुझ चांगलं होणार असेन तर मी नाही अडवणार तुला जा तू!!!” समीरची आई मनाला सावरत म्हणत होती. तिला त्याला अडवायच न्हवत. पण त्याचा विरह सहन करण्याची ताकद तिच्यात न्हवती.
कित्येक वेळ आई आणि समीर बोलत होते. सायली अचानक घरात येताना समीरला दिसताच तसेच समीर बाहेर निघून जाऊ लागला.
“काकु!! ” समीर ची आई आतून बाहेर येत होती. समीर न बोलताच बाहेर निघून गेला होता.
“काय सायली !! ”
“काकु काम होते तुमच्याकडे!!” सायली समीरच्या आईला अश्रू पुसताना पहात म्हणाली.
“काकु तुमचा चेहरा आज थोडा उदास का वाटतोय !! काहीं झाल का ??” सायली ने समीरच्या आईचे भाव बरोबर टिपले होते.
“काही नाही सायली !! मुलगा आपल्या पासून दूर जातोय म्हटलं की आईला त्रास होतोच !! ”
“म्हणजे काय काकु!!”
“समीर परगावी जातोय !! नोकरीसाठी!! ” समीरची आई असे म्हणताच सायलीला काय बोलावे तेच कळेना.
“पण अचानक कसकाय??”
“चांगली संधी आहे म्हणाला!! मला ही त्याला अडवाव वाटलं नाही !! शेवटी मीही एक आईच ना , मुलाच्या विरहाच्या विचारानेच डोळ्यात अश्रू आले!! पण त्याच चांगलं होत असेन तर मी कशाला अडवू!!” समीरची आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली. सायली कित्येक वेळ भानावरच न्हवती.
“तुझ काही काम होत म्हणालीस!!!” समीरची आई सायलीला विचारत होती.
“हो काकु !! पण विसरले मी काय काम होत ते!! मी नंतर येते !!!” अस म्हणत सायली तिथून बाहेर पडली.
सायली कित्येक वेळ घराच्या बाहेरच समीरच्या विचारात आणि तो येण्याची वाट पहात थांबली. असा कसा कसा जाऊ शकतो समीर. त्याला एकदाही हा निर्णय मला सांगावा अस वाटल नाही. का वागत असेन तो असा माझ्याशी? पण मला तरी त्रास का व्हावा त्याच्या जाण्याचा. मी इथे का थांबली आहे त्याची वाट पाहत. का?? मी प्रेम तर नाहीना करत त्याच्यावर.!! नाही नाही!! मी वाईट आहे समीरच्या नजरेत मी वाईट आहे. मी नाही बोलणार त्याला. तो माझ्यामुळेच चालला आहे दुर!! असा कसा वागू शकतो तो!! पण मी का म्हणून बोलू त्याच्याशी!! कित्येक वेळा मी समोर आले त्याच्या तरीही तो मला बोला नाही. वाढदिवसाला ही आला नाही. नाही नको !! मी बोलले तर परत म्हणेन की मी मागे मागे असते म्हणून!! नाही नकोच !! हो मी मान्य करते की मी करते प्रेम त्याच्यावर !! पण मीच का बोलायचं!! नाही मी नाही बोलणार!! तो जाणार असेन तर जाऊदे !! त्याच्या नसण्याचे दुःख मी सहन करेन पण मी नाही बोलणार त्याला !! समीर एवढं छान नात आपल अस का रे तुटलं सांग तरी!! मी नाही बोलले तरी तू बोल !! माझ्या मनात फक्त तूच आहेस!! पण मला वाईट समजून तू माझ्याशी अस नकोस वागू रे !! मी नाहीये वाईट!!
असंख्य विचारांचा कल्लोळ चालू होता सायली फक्त विचार करत होती. समीर पुन्हा तिच्या समोर यावा आणि तिला बोलावा एवढंच तिला हवं होत. मनातल सार काही बोलायचं होत. पण मीच का ?? हेच फक्त अडवत होत. सायली विचार करत असताना समीर तिच्या अचानक समोरून जाताना तिला दिसला. त्यानं पाहिलं तिच्याकडे पण तो बोलला नाही. सायली फक्त बघतच राहिली.
समीर घरात निघूनही गेला. सायली तिथेच उभी होती. तिला वाटलं होत समीर तिला सांगेन की तो चाललाय पण तो बोललाच नाही. घरी समीर गेला आणि सायली बद्दल मनात असंख्य विचारांमध्ये दंग होऊन गेला. कशासाठी सांगू मी तिला, की मी आता कायमचा निघून जातोय इथून!! त्याचा काही फरक पडणार नाहीये आता !! ती पाठमोरी जातानाच जेव्हा तिच्यासाठी कविता लिहिली तेव्हाच ती माझ्या मनात घर करून राहिली होती!! प्रत्येक क्षण एकमेकांना सांगणारे आम्ही , पण ती काहीच सांगत न्हवती!! मग मी का सांगू की मी आता इथून निघून जातोय!! आणि असही मी गेलो तरी काय फरक पडणार आहे तिला !! तुषार आहेच ना तिच्या आयुष्यात!! नाही मी नाही सांगणार तिला की मी आता इथे राहणार नाही ते !! मला तिला विसराव लागेन !!आणि ती अशीच समोर राहिली माझ्या तर मी कधीच नाही विसरू शकणार तिला !! तिच्यावर माझ प्रेम कायम असेन पण तिच्या आयुष्यात आता मी कुठेच नसेन..!! माझ्या किवितेतून फक्त तिलाच शब्द बोलतील !! पण ते तिला कधीच कळणार नाहीत !! नाही मला तिला आता विसरावंच लागेन !!!!
समीर असंख्य विचारत हरवुन गेला होता. त्याला सायलीला विसरायचं होत…!!

क्रमशः

-योगेश खजानदार

सुर्यास्त (कथा भाग -४)

माझ्या मनाचा थोडाही विचार का केला नाही समीरने, तो असा का निघून गेला. अशा विचारात सायली रात्रभर जागीच राहिली. सकाळच्या वेळी सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण तिला प्रतीक्षा होती ती समीरच्या शुभेच्छाची . संध्याकाळी सायलीच्या घरी सगळे जमले.
“काकु समीर??” सायली उस्कुतेने विचारू लागली.
“तो नाही आला, त्याला बर वाटत नाही म्हणाला!! ” आई सायलीकडे पहात म्हणाली.
“सायली घरातून बाहेर पहात गच्चीवर पाहू लागली. समीर गच्चीवर बसलेला दिसला. पण तो आला नाही. तुषार , सचिन सगळे आले. सायलीची आई तिला बोलावू लागली. सगळे मिळून तिचा वाढदिवस साजरा करू लागले. पण सायलीच मन काही त्यात लागतं न्हवत. तिच मन समीर का आला नाही यातच गुंतून राहील होत.
“सायली ,समीर नाही आला ते ??” सचिन सायलीला विचारू लागला.
“अरे त्याला बर वाटत नाही म्हणे!! ”
“सायली तुझा वाढदिवस आणि समीर नाही आला?? अस कस वागू शकतो तो?? ” सचिन तिच्याकडे पाहत ! म्हणाला.
” जाऊ दे अरे !! त्याला बर वाटत नाही म्हणून आला नाही तो!! बाकी काही नाही!!” सायली सावरासावर करत म्हणाली.
“काही नाहीं !! तो असाच आहे बघ!! कालच मला म्हणत होता , सायलीच्या वाढदिवसाला मला यायचं नाही म्हणून!! ”
“पण का असे !!” सायली अगदी मनातुन विचारू लागली.
“त्याला तुला बोलायचं नाही, म्हणत होता की सायली चांगली मुलगी नाही म्हणून!! मला तिच्याशी कोणतही नात ठेवायचं नाही !! ” सचिन एका वेगळ्याच उद्देशाने बोलू लागला.
“काय असा म्हणाला समीर ??” सायलीला सचिनच्या या बोलण्याने धक्काच बसला.
“हो!! तो म्हणे सायली माझ्या उगाच मागे मागे असते !! तिला काही कळतं नाही!! ” सचिन खोट्या शब्दाची एक रेष सायलीच्या मनात ओढू लागला.
“अस असेन तर मीही नाही बोलणार त्याला, मी वाईट आहे ?? तो बोललाच कस अस.
“जाऊ दे सायली आता हा विषय इथेच संपव!! आणि समीरशी बोलूच नकोस!!त्याचे विचार तुझ्याबद्दल चांगले नाहीत !! ” सचिन अगदी मनातली आग ओकत बोलू लागला.
सायली मनातुन पूर्ण उध्वस्त झाली. ज्या समीरला आपण एवढं मनापासून आपलं समजल तो माझ्या बद्दल असे बोलावा याचा तिला विश्वासाचं बसेना. ती कित्येक वेळ कोणाशी काहीच बोलली नाही. सगळे आलेले मित्र, समीरची आई सगळे निघून गेले. सायलीला तेही लक्षात आले नाही. एकांतात बसून ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. इकडे गच्चीवर सचिन आपल्या वहीत सायलीला शब्दांमधे लिहीत होता तिच्या असण्याला आपल्या शब्दात सांगत होता. त्या वहीची कागदे ते सगळं जड मनाने टिपून घेत होते..

“तुझ्या असण्याची जाणीव मला
ही हळुवार झुळूक का द्यावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी

हे फितूर झाले वारे मजला
कोणती ही आठवण यावी
तुझ्या सुंदर पानांच्या वहीत
एक ओळ माझी दिसावी

नसेल आज तुझ्या जवळ मी
कोणती ही सल मनात असावी
तुझ्या पासून दुर राहुन मी
स्वतःस आज का शिक्षा द्यावी

सांग वाऱ्यास या सारे काही
खोटी सारी गोष्ट असावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी!!!

समीर सारे काही मनातल त्या वहीत लिहिताना कित्येक वेळ तिथेच बसून होता. गच्चीवरून खाली येताच आईने त्याला सायलीकडे का आला नाहीस म्हणून विचारले असता त्याने काहीच न बोलता घरातून बाहेर निघून गेला. बाहेर जाताना सायली त्याला समोरच दिसली. पण यावेळी सायली समीरकडे पाहूनही न पाहिल्या सारखे करून निघून गेली. समीरला याच थोड नवल वाटलं पण त्याने याचा विचारही केला नाही.
आज कित्येक वर्षे मनातल सगळं सांगणारे ते दोघं एकमेकांना अनोळखी झाले होते. समीर बाहेर जाताना त्याला तुषार वाटेवरच भेटला.
“काय रे समीर!! आला नाहीस सायलीच्या वाढदिवसाला? ” तूषारचा ओठांवर वेगळेच हास्य होते.
“नाही अरे !! बरं वाटतं न्हवत म्हणून नाही आलो!! ” समीर तुटक बोलत होता. त्याला तूषारला बोलावं वाटत न्हवत.
“अरे सायली तर म्हणाली की तुला तिने सांगितलच नाही म्हणून!! ”
“जाऊदे अरे !! जातो मी!!” समीर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता.
“अरे थांब रे!! काय भांडलास की काय सायलीशी!! मला म्हटली ही होती की फार भांडतोस म्हणून तिला!! भेटते मला ती तेव्हा सांगत होती!! ”
“मला याविषयी काही बोलायचं नाही !! तुषार मी जातोय.
समीर तिथून निघून गेला त्याला हे सारं नकोस झाल होत. समज गैरसमज आणि नात्यांच्या डावपेचात समीर आणि सायली हे नात कोमेजून जात होत.

क्रमशः

-योगेश खजानदार