पांथस्थ…!!

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची
त्या सावलीतला मी एक पांथस्थ
हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी
पुढच्या प्रवासास मी आहे सज्ज

कधी भेटे कोणी ,कधी मी हरवूनी
माणसातला मी उरतो इथे फक्त
वेगळे वेष दिसूनी, वेगळी भाषा बोलूनी
आठवणींचा पसारा राहतो आहे एक

कित्येक पावले चालूनी, एकांती स्वतः स भेटूनी
रात्रितल्या चांदण्या ओळखतात मला फक्त
थकतात पावले दोन्ही, डोळ्यात आहे पाणी
मागे वळून पाहताना होतात मग ते व्यक्त

खचते मन जेव्हा, पावले अबोल राहतात तेव्हा
पुढच्या वाटेस दोष देत, भांडतात तेव्हा ते शब्द
तरी चालतं जाताना, नव्या वाटेस भेटताना
विसरून जाते मन लगेच ते सारे दुःख

हा प्रवास माझा असा, सांगावा तरी कसा
वाटा बोलतात आणि मी ऐकतो त्यास फक्त
जणू चालत राहावे , अनुभव घेत राहावे
कारण, त्या सावलितला मी एक पांथस्थ
✍ योगेश खजानदार

माणूस म्हणुन…!!!

शोधायचं आहे आज
माझेच एकदा मला
कधी कोणत्या वळणावर
भेटायचं आहे मला

कधी अनोळखी होऊन
विचारायचं आहे मला
कधी हरवलेल्या विचारात
पहायचं आहे मला

नसेल चिंता कशाची
मुक्त फिरायच आहे मला
बांधलेल्या हातास आता
सोडायचं आहे मला

आपल्यात आपण, सगळ्यात सगळे
अस्तित्व पाहायचे आहे मला
वेगळं होऊन या दुनियेत
जगायचं आहे मला

मी ,माझा , माझ्यात मीच
कोण आहे बघायचं आहे मला
कधी स्वतःस भेटून एकदा
विचारायचं आहे मला

उधळून, फेकून, जाळून ही
ही लखतर फेकायची आहेत मला
माणूस म्हणून या जन्मात
जगायचं आहे मला

हो !!माणूस म्हणून या जन्मात
जगायचं आहे मला !!!
✍योगेश खजानदार

अबोल राहून…!!

“अबोल राहून खूप काही बोलताना तिच्याकडे फक्त बघतच रहावं तिच्या प्रत्येक नखऱ्याला डोळ्यात फक्त साठवून घ्यावं नसावी कसली भीती तिला तिच्यासारखं आपणही बिंधास्त रहावं अल्लड प्रेमाची भावना समजून घेताना उगाच आपणही हरवून जावं ओढ असावी ही मनात तिच्या तिने ते नजरेत बोलून दाखवावं मी मात्र उगाच शोधताना मनात माझ्या तिला पहावं असे हे नाते मनाचे नेहमीच नव्याने तिने फुलवाव कधी हसू कधी रडु पण सतत माझ्या सोबत रहाव कितीदा भेटाव तिला तरी पुन्हा पुन्हा त्या वाटेवर जावं तिच्या येण्याकडे तेव्हा नजर लावून पहात रहावं…!!” ✍योगेश खजानदार

त्या वाटेवरती…!!

मी पुन्हा त्या वाटेवरूनी तुला पहात जावे
किती ते नजारे आणि किती ते बहाणे
कधी उगाच त्या वाटेवरती घुटमळत राहता
कोणती ही ओढ मनाची कोणते हे तराणे

कशी आस लागली या मनास कोणती
त्यास वेडे म्हणावे की निशब्द रहावे
सांगशील का एकदा मला तु हे काही
प्रेमाची चाहूल म्हणावे की उगाच स्वप्नी रहावे

कधी पावसाच्या सरी तुझी आठवण देती
तुझ चिंब भिजलेले पहावे की स्वतःस शोधावे
कधी नजर भिरभिरते सगळीकडे उगाच
मनास समजुन सांगावे की नजरेत तुझ पहावें

हे सारे जणु भास मनीचे चालता
हे क्षण खोटे ठरावे की स्वतःस थांबवावे
ती वाटही पुसते आज मझ काही
तुझेच नाव घ्यावे की तुलाच मग लपवावे

का मी उगाच तेव्हा त्या वाटेवरती
तुला पहात राहावे आणि तुलाच न पहावें
घुटमळत राहावे त्या आठवणी भोवती
तुलाच ते सांगावे की नकळत तुझ्यावर प्रेम करावे
-योगेश खजानदार

आठवणी…!!

हळुवार त्या पावसाच्या सरी
कुठेतरी आजही तशाच आहेत
तो ओलावा आणि त्या आठवणी
आजही मनात कुठेतरी आहेत

चिंब भिजलेले ते क्षण
आजही पुन्हा भेटत आहेत
पण त्या पावसात आज मला
त्या सरी का शोधत आहेत

हरवलो असेन मी कुठेतरी
त्या प्रत्येक थेंबाशी बोलत आहेत
माझेच मला मी न सापडावे
इतके का ते मला अबोल आहेत

पण तुझ्या असण्याचे ते आज
सर्व काही सांगत आहेत
प्रत्येक सरीत त्या आठवणी
तुलाच का पहात आहेत

हे मन माझे वेडे
तुझेच भास होत आहेत
प्रत्येक क्षणात चिंब भिजुन
तुझ्याच आठवणीत रहात आहेत

का अशा ह्या पावसाच्या सरी
फक्त तुझ्याच आठवणी सांगत आहेत
जणु तो ओलावा आणि त्या आठवणी
चिंब पावसात भिजत आहेत
✍योगेश खजानदार

कोऱ्या कागदावर..!!

image

कोऱ्या कागदावर…!!

#Yks

तासनतास कोऱ्या कागदावर
तुझ्याचसाठी मी लिहावे
कधी नकळत ते शब्दही तेव्हा
तुझ्याच प्रेमात पडावे

मी विसरून शोधतो तुला
स्वप्नांच्या या जगात रहावे
आणि सुराच्या सवे मी तेव्हा
गीत तुझेच गावे

कसे हे वेड लागले मझला
स्वतःस मग विसरून जावें
तुलाच पाहण्या या वेड्या नजरेने
पापण्यास विसरून जावे

कधी अकारण बोलण्याचे बहाणे
तुलाही कळून मग यावे
कधी कारण भेटण्याचे तुला नी
मनातले जणु ओठांवर न यावे

सखे असे का मन हे बावरे
तुलाच न कळावे
प्रेम हे माझे किती तुझ्यावर
तुलाच का न सांगवे?

ओठांवरील शब्दही तेव्हा
ओठांवरच का राहावे?
कधी नकळत तेही तेव्हा
तुझ्याच प्रेमात पडावे

आणि तासनतास कोऱ्या कागदावर
तुझ्याचसाठी मी लिहावे!!!
✍ योगेश खजानदार

image

तुला लिहिताना..!!

image

‘तुला लिहिताना..!!’

#Yks

“मनातल्या तुला लिहिताना
जणु शब्द हे मझ बोलतात
कधी स्वतः कागदावर येतात
तर कधी तुला पाहुन सुचतात

न राहुन स्वतःस शोधताना
तुझ्या मध्येच सामावतात
कधी तुझे नाव लिहितात
तर कधी कवितेत मांडतात

का असे वेडे नयन हे
शब्दा सवे हरवतात
कधी मलाच न भेटतात
तर कधी तुलाच न शोधतात

सांग सखे काय करु
तुलाच न सांगतात
कधी वही मध्ये लिहितात
तर कधी ह्रदयात कोरतात

मनातल्या तुला लिहिताना
जणु भाव हे मझ बोलतात
कधी क्षणात तुला पाहतात
तर कधी तुझी साथ मागतात..!”
-योगेश खजानदार