राजं मुजरा..🙏

“शस्त्र, शास्त्र आणि शौर्य
यांचं एक रूप राजं माझे
हाती भवानी तलवार
ध्येय हिंदवी स्वराज्य
आणि वादळाशी झुंज
असे आहेत राजं माझे

थरथरला गनीम जिथं
झुकल्या कित्येक माना इथ
आई भवानीचा आशीर्वाद घेऊन
साकारले स्वप्न रयतेचे जिथं
असे आहेत राजं माझे

तळपत्या त्या सूर्या सम तेज
आकाश कवेत यावे असे हृदय
वाऱ्यासही हेवा अशी ती दौड
बरसत्या त्या सरींची तमा न ज्यांस
असे आहेत राजं माझे

प्रत्येक मावळ्यात एक विचार
गडकोट आजही करतो जयजयकार
ज्यांनी घडवला इतिहास
हृदयात आता एकच नाव
असे आहेत राजं माझे

गेली कित्येक वर्ष तरी आज
अखंड तेवत आहे एक ज्योत
हिंदवी स्वराज्य संस्थापक
राजा शिवछत्रपती ज्यांचे नाव
असे आहेत राजं माझे..!”

✍️©योगेश खजानदार

Advertisements

शब्द माझे ..✍️

“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत

कधी हसले ओठांवर जेव्हा
कागदास ते बोलले आहेत
कित्येक गुपिते तेव्हा जणू
पानास त्यांनी सांगितले आहेत

राहिले जेव्हा मनातच सारे
अबोल ते झाले आहेत
येता समोरी तू अचानक
उगाच मग अडखळले आहेत

गुणगुणत्या क्षणात तेव्हा
अलगद ते हरवले आहेत
कधी मिठीत , कधी दूर
कवितेत त्या बोलले आहेत

सांग सारे मनातले तुझ्या
मलाच हट्ट करत आहेत
तुझ्यासाठी हे भाव जणु
मनी त्या दाटले आहेत

नकळत चोरून मग तेव्हा
तुलाच ते बोलत आहेत
ते शब्द माझेच मला मग
फितूर का झाले आहेत??

लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत …!!!!”

✍️©योगेश खजानदार