स्वप्न ..!!(कथा भाग ५)

पाहता पाहता सकाळ झाली. सूर्याची किरणं झाडा फुला पानांना बोलू लागली. आज सुनील खूपच आनंदात होता. चंदा आणि तारा त्या बोरुवस्तीतील मुली आज शाळेत शिकायला येणार होत्या. त्याची लगबग पाहून मंदा त्याला बोलू लागली.
“सुनील अरे नाश्ता तरी करून जा बरं !! पुन्हा किती वेळ लागेल तुला माहित नाही!!”
“आई नकोय मला !! उमा जेवायला डबा घेऊन येणारे शाळेतच !!” सुनील आवरत म्हणाला.
“अस का !! बरं बरं !!” मंदा गालातल्या गालात हसत म्हणाली.
सुनील ने मंदा हसली ते बरोबर पाहिलं. आणि मंदाकडे पाहत बोलू लागला.
“काय ग आई !! मी कालपासून पाहतोय !! उमाच नाव घेतलं की तू आणि आप्पा हसताय का बरं ??”
” काही नाहीरे असच !! ”
“खरं सांग बर आई !!”
” अरे काही नाही ! उमाला विचार हवं तर !!” मंदा बोलत बोलत स्वयंपाक घरात निघून गेली.
सुनील आवरून बाहेर पडू लागला. उमा समोरून चालतं येत होती. तिला पाहताच सुनील क्षणभर थांबला तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि अचानक भानावर येत बोलू लागला.
“काय किती वेळ !! उशीर का केलास आज !! ” सुनील जवळ येत असलेल्या उमाकडे पाहत म्हणाला.
“अरे आवरायलाच उशीर झाला!! आता चल पटकन!! ” उमा सूनीलकडे पाहत म्हणाली.
उमा आणि सुनील दोघेही शाळेत आले. त्यांचे मित्र केव्हाच येऊन थांबले होते. आज कित्येक जण वेगवेगळ्या वस्तीत जाऊन जनजागृतीचे कार्य करणार होते. सुनील आणि त्यांची कित्येक वेळ चर्चा झाली आणि ते जाऊ लागले. तेवढ्यात चंदा आणि तारा दोघीही शाळेत आल्या. उमा दोघींना घेऊन त्या बंगल्यात बसली. सुनील बाहेर मित्रांशी बोलू लागला. बंगल्यातल्या खोलीत शिकवणाऱ्या उमाकडे बघू लागला. तेवढ्यात सुनीलचा एक मित्र पळत त्याच्याकडे आला. तो धापा टाकत बोलू लागला.
“सुनील !! अरे !! अरे !! ” सुनील त्याला सावरू लागला.
“अरे सुहास झाल काय !! ”
“अरे !! बोरुवस्तितील काही लोक इकडे आपली शाळा बंद करायला येतायत!! ” सुहास जोरात श्वास घेत बोलू लागला.
“त्यांच्यातला एक म्हणत होता !! यांना आज सोडायचं नाही म्हणून !! ”
“काही होत नाही !! आपण खंबीर आहोत सगळे !! ”
सुनील बोलत शांत झाला. उमाला सारा प्रकार कळला . ती सुनीलला बोलू लागली.
“सुनील अरे आपण पोलिसांना बोलवायचं का ??”
“नाही नको !! ” सुनील शांत बोलत होता.
अचानक बंगल्याच्या बाहेर जोरजोरात लोक बोलू लागले.
“कुठ आहेरे त्यो साला!! ” काढा बाहेर त्याला !! ” गर्दीतला कोणी एक बोलू लागला.
“ये धर्म बुडव्या येतो का बाहेर !! ”
सुनील शांतपणे बाहेर आला. आणि त्यांना बोलू लागला.
“हे बघा !! हे सगळं जे मी करतोय ते तुमच्या मुलांच्या आणि या मुलींच्या भल्यासाठीच आहे !!”
“ये तू नको रे शिकवू आम्हाला !! ” गर्दीतील लोक बोलू लागले.
” अरे बघताय काय हाना साल्याना !!!” गर्दी आक्रमक झाली.
सुनील, उमा आणि सारे मित्र निडरपणे उभे होते. अचानक त्या गर्दीला भेदत कोणी एक स्त्री सूनीलकडे आली सुनील वर उगरालेल्या हत्याराला लांब भिरकावत देत सुनील जवळ आली. सुनील आणि सारे बघत राहिले. ती बोलू लागली.
“खबरदार या पोरांना हात लावलं तर !! ये किसण्या लाज वाटते कारे या चांगल्या माणसांना मारायला..!! तुमच्या पोरांना शिकवायच म्हणत्यात ही पोरं!! आणि तुम्ही ह्यांना मारताय !! कारे भाड्या हनम्या सावकाराण गिळली ना जमीन तुझी!! शिकला अस्तास तर अंगठा लावायची येळ आली नसती !! आणि त्या सावकारान काय लीव्हलय ते वाचलं असतस की नाही!! अरे त्या चंदा आणि तारा रांडच्या पोरी पण शिकायला आल्या !! कारण त्यांना त्या नरकातून बाहेर पडायचं !! ” ती स्त्री प्रत्येकाला बोलू लागली. गर्दी सारी मान खाली घालून ऐकू लागली.
सुनील आणि उमा त्या बाईकडे बघतच राहिले. ती कोण कुठली काही माहीत नसताना ती धावली. त्या भविष्यासाठी.
“ये रखमे !! तू बाजूला हो !! धर्म बुडवले याने आपला !! पोरीला शिक्षण असतं का !! ” गर्दीतून कोणी एक बोलू लागला.
“हो रे !! धर्म बुडवले ना! पोरगी शिकली की धर्म बुडणार !! अरे तुझा धर्म याच पोरिनी वाढवला ना रे !! मग तिलाच हा अधिकार का नाही ??” सगळी गर्दी शांत झाली.
“रखमे तू बरोबर नाहीं केलास !! ” असं म्हणत सगळी गर्दी निघून गेली.
सुनील आणि उमा त्या स्त्रीला त्या रखमाला बोलू लागले.
“बाई आज तुम्ही अगदी वेळेवर आलात!! ”
“तुम्ही खरंच खूप चांगला दम दिला त्यांना!!” उमा म्हणली.
“परवा तुम्ही आलात तेव्हाच बघितलं होत मी तुम्हाला!! मला वाटलं काय खरं तुमचं!! पण तुम्ही माग नाही सरला !! आणि तिथंच ठरिवलं की तुमच्या या कामात आपण पण येणार म्हणून!!” रखमा दोघांकडे बघू लागली.
“बाई तुम्ही या कार्यात येताय याचा आम्हाला आनंद आहे !!” सुनील रखमाकडे बघत म्हणाला.
“आहो हे तर काहीच नाही!! उद्या वस्तीतल्या दहा बारा बाया यायचं म्हणतायत शिकायला!!” रखमा उमाकडे पाहत म्हणाली.
“आहो पण या लोकांच काय करायचं !! ” उमा चिंतेच्या स्वरात म्हणाली.
“त्यांची काही काळजी करू नका !! उद्या यांच्या बायकाच येनारायत शिकायला !!” रखमा हसत म्हणली.
सुनील आणि उमा दोघे ही हसू लागले.
“उमा पुन्हा बंगल्यात गेली. चंदा आणि ताराला शिकवू लागली. बघता बघता संध्याकाळ झाली. उमा आणि सुनील घरी जायला निघाले.
“काय ग उमा मला एक विचारायचं होत तुला!!” सुनील उमाकडे बघू लागला.
“काय ?”
“हल्ली आप्पा आणि आई तुझ्याबद्दल फारच विचारतात मला !! आणि काही बोललं की हसतात!!” सुनील चालत चालतं बोलू लागला.
“होका !!” एवढंच बोलून उमा हसू लागली.
“आता हे काय !! तूही हसतेयस !!” सुनील उमाला विचारू लागला.
“अरे हसू नको तर काय करू !! जे आप्पा आणि आईला कळलं ,ते सारखं माझ्या सोबत असणाऱ्या तुला कळलं नाही !! म्हणून हसतात ते !! ”
“म्हणजे ??” सुनील प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला.
“अरे सुनील!! कस सांगू आता मी!! ” उमा सूनिलपासून लांब जात म्हणाली.
“सांग ना !! ” सुनील विचारू लागला.
“नाही सांगता येणार रे !!” उमा वळून पाहत म्हणाली.
“मग मी आप्पा आणि आईला विचारतो !!”
” हो विचार !! नक्की विचार !! मी तुझ्यावर प्रेम करते हे त्यांना नक्की विचार हा तू !! आणि त्यांनाच सांग तुज माझ्यावर प्रेम आहे की नाही ते !! ” उमा झटकन खोट्या रागात असल्यासारखे भराभर चालू लागली.
सुनील मागेच राहिला.
“अशी काय बोलते ही !! मी तिच्यावर प्रेम करतो हे मी आप्पा आणि आईला का सांगेन !! ते तर हिलाच सांगितलं पाहिजे ना!!” सुनील अचानक कित्येक भावना बोलून दाखवू लागला.
त्याला काय बोलावं तेच कळेना. पुढे निघून गेलेल्या उमाला त्याने थांबवलं. उमा वळून मागे पाहू लागली.
“माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी तुलाच सांगितलं तर चालेल का??” सुनील हळुवार हसत म्हणाला.
“नाही नको !! आप्पा आणि आईलाच सांग !!”
” बर ठीक आहे !! ते तर सांगेन मी !! ”
” पण तुझ्यावर माझं प्रेम आहे हे नक्की !! तुझ्या असण्याने मला पूर्णत्व आहे !! ”
“मलाही तुझ्या प्रेमाची सावली हवी आहे सुनील !!”
सुनील आणि उमा त्या सांजवेळी एकमेकांच्या मिठीत सामावून गेले. प्रेम व्यक्त झाले. ओठातून ओठांवर नकळत आले. उमाला सोडून सुनील घरी गेला. दरवाजातून तो आप्पा आणि आईला हाक मारू लागला.
“आप्पा !! कुठे आहात !! ”
“अरे असणार तो कुठे मी !!” आप्पा खोलीतून बाहेर येत म्हणाले.
मंदा बाहेर येत बोलू लागली.
“काय रे सुनील !!काय झाल एवढं !! ”
“काही नाही आई !! तुझ्या आणि आप्पांच्या हसण्याच गूढ कळलं बर मला !! ”
“चला म्हणजे कळलं तर एकदाच !! ” आप्पा सुस्कारा सोडत म्हणाले.
“बाकी शाळेत आज खूप काहीं झाल!! ” सुनील आप्पांकडे बघत म्हणाला.
“काय रे !!”
सुनील आप्पा आणि मंदा शाळेत काय घडल यावर कित्येक वेळ बोलले. सुनीलने सारी हकीकत सांगितली. नंतर रात्री जेवण आटोपून आप्पा लिहायला बसले.

क्रमशः ..

✍योगेश खजानदार

Advertisements

Published by

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.