स्वप्न ..!!(कथा भाग ४)

नव्या स्वप्नाची ती चाहूल होती. ते प्रेम अलगद मनात घर करत होते.
“उमा !! सकाळपासून पाहतोय तुझ लक्ष नाही कशातच !! ” अचानक बाहेर जाताना सुनील बोलला.
“अरे !! काही नाही असच !! ”
दोघेही चालत चालत गावाच्या पलिकडे एक बंगला होता तेथे आले. त्याच्या मित्रांनी आणि सुनील उमाने तो सगळा नीट स्वच्छ करून घेतला.
“अरे सुनील !! बोरुवस्तित आपले पोरं परत जाऊन आले!! त्यांनी आतमध्ये सुधा येऊ दिलं नाही!!” सूनीलचा मित्र त्याला म्हणाला.
“प्रयत्न करूयात रे !! आपण नक्की यशस्वी होणार !! ” सुनील आत्मविश्वासाने म्हणाला.
“या समाज आणि रुढी परंपरा यांनी आजपर्यंत या लोकांना जखडून ठेवलंय!! हे शिक्षण म्हणजे मुलीला नवीन आयुष्य नाही तर नवी स्वप्न आहेत !! हे त्यांना कळतं का नाहीये !!! ” उमा अगदिक होऊन म्हणाली.
“नक्कीच यांना कळेल एक दिवस !! आपण नाही हार मानायची!!” सगळे सूनिलकडे पाहू लागले.
दुपार झाली. संध्याकाळ होत आली तरी शाळेत कोणी येईना. सुनील उमा सगळे निराश झाले. सुनील घरी जायला निघाला. उमा ही घरी जाऊ लागली. शाळा बंद झाली.
“तुम्ही शाळा सुरू करणार का??” अचानक सुनील जाताना त्याच्या मागून आवाज आला.
सुनील मागे वळून पाहू लागला. आणि एका स्त्रीला बघून म्हणाला.
“हो!! गरीब मुलांसाठी शाळा!! खासकरून मुलींना शिक्षण द्यायचं हा उद्देश !!”
“मग पोरी येतात शाळेत ??”ती स्त्री अचानक म्हणाली.
“अजुन तरी नाही !! पण एक दिवस नक्की येतील!!”
“मी आणि माझी बहिण आलो तर चाललं ??” ती स्त्री बोलली आणि सुनीलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
“चाललं म्हणजे काय !! चालेलंच..!! ” सुनील आनंदाने म्हणाला.
“बरं मग मी उद्या येते!! ” स्त्री जात म्हणाली.
“आहो पण तुमचं नाव काय ??” सुनील.
“चंदा !! आणि माझी बहिण तारा !! आम्ही बोरुवस्तीतल्या आहोत !! ” ती निघून जात म्हणाली.
सुनीलला काय बोलावं तेच कळेना. त्याने उमाला अचानक मिठीच मारली.
“उमा पाहिलंस !! आपलं स्वप्न पूर्ण होणार !! त्या गरीब मुलींना शिकवायच हे कार्य अजुन वाढवायचं!!”
उमा निशब्द होती . ती फक्त सुनीलच्या चेहऱ्यावरचे हास्य टिपत होती.
“येते मी !! ” भानावर येत उमा म्हणाली.
“चाललीस काय उमा !! थांब ना जरा !! ”
“अरे नको !! उद्या भेटुयात ना !! ”
उमा बोलून निघून गेली. सुनील सरळ घरी गेला. त्याला ही गोष्ट कधी एकदा मंदा आणि आप्पाला सांगेन अस झाल होत.
“आप्पा !! आप्पा!! कुठे आहात ?” सुनील बाहेरूनच आप्पांना हाक मारत आला.
आप्पा आणि मंदा दोघेही घराच्या अंगणात गप्पा मारत बसले होते. सुनील तिथे पोहचताच आप्पांनी त्याच्याकडे पाहिलं.
“काय सुनील !! एवढ काय झालं !! आधी बस, शांत हो!! ”
“आप्पा !! आज घडलेच तसे ना !! ”
“काय झालं !!” मंदा सूनिलकडे पाहत म्हणाली.
“आई!! बोरुवस्तीतून उद्यापासून दोन मुली शाळेत येतायत !!! ”
अरे वां!! ही तर खरी आनंदाची गोष्ट !! सुनील पोरा उत्तम कार्य करताय तुम्ही!!” आप्पा मनसोक्त बोलले.
“पण मला भीतीच वाटते बाई !! ती माणसं खूप वाईट आहेत म्हणे!!” मंदा चिंतेच्या सुरत म्हणाली.
“त्यात काय भ्यायच मंदा !! आपली पोरं काय त्यांचं नुकसान नाही करत !! ” आप्पा बोलले.
आप्पा मंदा आणि सुनील कित्येक वेळ बोलले . अचानक आप्पांनी सुनीलला विचारले.
“उमा काय म्हणते !!”
“काय म्हणणार !! ऐकून खुश झाली !! ” सुनील आप्पाकडे पाहू लागला.
“बास एवढंच??” आप्पा मिश्किल हसले.
“अजुन काय म्हणायला हवी ती !! “सुनील आप्पांना विचारू लागला आणि म्हणाला.
असंही आज काय झालं होत की तिला.!! गप्प गप्पच होती दिवसभर !! विचारलं तर काही सांगितलं नाही तिने!!!”
“समाज कार्य करतायत !! जरा त्यातूनही दुसरीकडे बघा म्हणजे कळेल!!” आप्पा खुर्ची वरून उठत म्हणाले.
“म्हणजे !! ” सुनील प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला.
“म्हणजे !! म्हणजे !!! तेही आम्हीच सांगायचं !! ” आप्पा खोलीत निघून गेले.
मंदा सूनीलकडे हसून स्वयंपाक घरात निघून गेली. सुनील कित्येक वेळ विचार करत राहिला.
“लेखणीच्या आधारावर कित्येक गोष्टी मी अशा स्वप्नातून सत्यात आणल्या. नाटकाद्वारे किंवा माझ्या पुस्तकांद्वारे, पण एक गोष्ट सत्य होती की हे सारं खोटं आहे.” आप्पा खोलीत येताच वहीत लिहू लागले.
“आणि या खोट्या गोष्टींच्या मागे धावताना मला खऱ्या क्षणांची कधी जाणीवच झाली नाही. मंदावर माझं प्रेम आहे हे कित्येक वेळा मला कळलंच नाही. ते खोटे मुखवटे , ती खोटी पात्रे!!! आणि माझ्या सत्यातील ती मंदा !! कुठेतरी विसरते आहे, ही जाणीव तेव्हा झालीच नाही !! आणि जेव्हा झाली तेव्हा तो क्षण खूप सुखाचा होता. माझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आलेली ती नाजूक आणि देखणी मुलगी माझ्या पुस्तकावर स्वाक्षरी मागते आहे आणि मी नकळत त्यावर स्वतःच स्वतःला हरवतो आहे हे कळलंच नाही. ज्यावेळी हे लक्षात आलं तेव्हा मंदा माझ्यासमोर होती. प्रेम अलगद मनात सांगत होती.” आप्पा क्षणभर लिहिताना थांबले. आणि पुन्हा लिहू लागले.
“माझ्या कवितासंग्रहा मधील प्रत्येक कविता तिला अगदी तोंडपाठ असायच्या. एखाद्या लेखकावर कोणी इतकं प्रेम करू शकत,?? हे मला तेव्हा कळाले! आजही मंदा माझ्या लिखाणाची पहिली वाचक असते. आजही ती तेवढ्याच उत्साहाने माझ लिखाण कविता वाचते,प्रेम होत नकळत !! आपण फक्त त्याला ओळखू शकत नाहीत !! पण खूप वेळ होण्या आधीच ते कळलं पाहिजे !! म्हणूनच व्यस्त आयुष्याच्या वेळेतून आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे !! ” आप्पा थांबले त्यांच्या आणि मंदाच्या जुन्या तारुण्यातल्या फोटोकडे पाहून हसले. त्या भिंतीवरून जणू तो फोटो डोकावून आप्पांचे लिखाण वाचू लागला.
“आहो !! येतायना जेवायला!!” मंदा बाहेरूनच आप्पांना बोलू लागली.
आप्पा खोलीचा दरवाजा उघडत बाहेर आले. दोघेही स्वयंपाक घरात बसून जेवू लागले.
“सुनील कुठे दिसत नाही !! ”
“झोपला आज लवकर !!”मंदा म्हणाली.
“मंदा !! तुला आठवत !! तुझी आणि माझी पहिली भेट केव्हा झाली होती.
“आज काय नवीन आता !!”
“काही नाही ग !! असच आठवण आली !!”
“तुमच्या लिखाणाच्या शाईतून आठवले दिसतायत जुने क्षण !!” मंदा हसून म्हणाली.
“हो!! ” आप्पा मिशिकील हसले.
जेवण झाल्यावर आप्पा आणि मंदा आप्पांच्या वहीत लिहिलेले वाचत बसले. कित्येक जुन्या आठवणी आठवू लागले.

क्रमशः

✍योगेश खजानदार

Advertisements

Published by

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.