बंद कवाडं

बंद कवडाच्या पलिकडे
तू कधी पाहिलच नाही
तो बेधुंद वारा बोलत होता
पण ते तू कधी ऐकलंच नाही

घुटमळत राहिले मन तिथेच
पण तू कधीं मुक्त झालीच नाही
कदाचित तू त्या भिंतींना
नीट कधी ओळखलंच नाही

बाहेर सारी पाखरे मुक्त होती
तू कधी पंख पसरवलेच नाही
त्या खिडकीतून तू कधी स्वतः ला
त्या आकाशात पाहिलेच नाही

एकांत होता तो त्या मनातला
ते छत कधीच बोललेच नाही
रात्रीच्या अंधाराने का कधीच
मनसोक्त तुला बोलूच दिले नाही

सांगत राहिले , तडफडत राहिले
पण ते तू कधीच का जाणले नाही
त्या कवाडां अलीकडे कदाचित
आपलेच तुला कधी भेटले नाही

उठ आता मुक्त फिरण्या
ती कवडाची बंधने शोभत नाही
पंख पसरून घे भरारी नव्या दिशेस
हे जीवन घुसमटत जगण्यास नाही
✍ योगेश खजानदार