सुनंदा…!!( कथा भाग ४)

” ये आजे , श्याम उठतं का नाहीये !! ” सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
“बाळा मी आले रे !! तुझी आई !! उठ ना पटकन!! चल बर आपण वैद्यांकडे जाऊयात!! तुला बरं व्हायचंय श्याम माझ्यासाठी!!! ” सुनंदा श्यामला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.
“सुनंदा , पहिलं त्याला कडेवर घे !! आपण त्याला वैद्याकडे घेऊन जाऊयात!! ” आजी गडबडीत बाहेर गेली. शेजारच्या एका पोराला तिने बैलगाडी आणायला सांगितली. श्यामला त्यात बसवून सुनंदा आणि आजी शेजारच्याच वाडीत जायला निघाले.
“आजी , श्याम बोलत का नाहीये मला!! ” ये श्याम उठ ना !! बाळा मी पुन्हा तुला कधी सोडून नाही जाणार!! ”
“होईल पोर नीट , तापेन पोराला सुधरत नाहीये !! ” आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली.
“देवाच्या चरणी बाकी काही मागं नाहीये माझं आजी !! हे पोर आहे म्हणून मी कसेतरी दिवस काढते आहे बघ!! तो नीच सरपंच, नुसतं बाई सोबत झोपायला पाहिजे त्याला!! पोर आजारी आहे म्हटल्यावर तरी निघून जाईल वाटलं होत , पण नाही !! ” सुनंदा रागाच्या स्वरात म्हणली.
“वासनेच्या आहारी गेलेल पिसाळलेल कुत्र आहे ते !! याला कसल्या आल्या भावना आणि मन !! ” आजी एकदम बोलून गेली.
बघता बघता वाडीच्या जवळ बैलगाडी आली. वैद्याच घर जवळ येताच सुनंदा खाली उतरली, धावत जाऊन तिने वैद्याच्या घराचा दरवाजा वाजवला.
” कोण आहे !! ” आतून वैद्य बोलता झाला.
“वैद्यबुवा , मी शेजारच्या गावची सुनंदा !! माझं पोर तापानी फणफणतय!! ” सुनंदा असे म्हणताच वैद्यबुवानी दरवाजा उघडला. श्यामला घरात घेऊन जात वैद्य म्हणाले.
“कधीपासून आहे ताप !!”
“दोन दिवस झाले!! ” आजी वैद्यानकडे पहात म्हणाली.
“मग यायला इतका उशीर का केला!! ”
वैद्यांनी अस विचारताच दोघीही काहीच न बोलता एकमेकांकडे पाहू लागल्या.
“बरं !! तापेचा जोर भयंकर आहे !! मी काही औषधं देतोय !! थोड्या थोड्या वेळाने त्याच्या जिभेवर ठेवत जा !! ”
” बुवा , बरा होईल ना माझा श्याम ???”
“तापेचं जोर खूप आहे बाई !! होईल तेवढी काळजी घे !! बाकी सगळं त्याच्या हाती आहे !!! ” अस बोलतच सुनंदा थोडी शांत झाली. परतीच्या प्रवासात तिने श्यामला आपल्या जवळ मांडीवर झोपवलं .
“आजी , या पोराची अवस्था अशी व्हायला मीच कारणीभूत आहे ना??” सुनंदा आजीकडे पहात म्हणाली.
“नाही ग पोरी!! तुझ्या नशिबाला जे आहे त्याच्याशी तू खंबीर पणे लढते आहेस !! त्यातूनही या पोराला तू घडवतेस!! ” या पोराला कधीही नसती भेटली अशी आई तू आहेस!!! ” आजी सुनंदाच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली.
“पण या नरकात त्याला दोष नसतानाही भोग का भोगावे लागतात ??”
“तुझ्यासारखे कित्येक वर्ष झाली मीही या प्रश्नाची उत्तरे शोधतेय बघ !! “आजी बैलगाडीतून उतरत म्हणाली. बघता बघता त्या दोघी घरी आल्या. सुनंदा श्यामला कडेवर घेऊन घरात आली. पलंगावर झोपवून. घरात काम करायला गेली.
“ये सुनंदा, दार उघडं !!! ”
“कोण आहे !!! ”
“मी आहे !! सरपंच!! ” सुनंदा दार उघडायला बाहेर आली.
“सरपंच आताच आले मी शेजारच्या वाडीतून!!! ”
“तिथं कोणाकड गेली होतीस झोपायला?? ” सरपंच अस म्हणत जोरात हसला.
“पोर खूप आजारी आहे !! तापेने त्याचा डोळा पण उघडत नाहीये !! त्यालाच वैद्याकड दाखवायला घेऊन गेलते !! “सुनंदा सरपंच कडे पाहत म्हणाली.
“ते पोर होय!! बरं ते जाऊ दे !!! त्याला उचल आणि बाहेरच्या अंगणात झोपाव !! उरक चल!!! ”
“सरपंच या वेळी नाही जमणार !!! तुम्ही जावा इथून!!” सुनंदा सरपंचाला हात जोडून बोलत होती.
“ये रांडिचे !! माझ्यासमोर असली नाटक चालायची नाहीत!!! जा त्याला बाहेर झोपाव …!! नाहीतर आताच्या आता या वस्तीतून आणि गावातून हाकलून देईन!! माहितेय ना मी कोणाहे ते !!! ” सरपंच डोळ्यातून आग ओकत बोलला.
“सरपंच !! मला माफ करा!!! मी भिक मागते तुमच्यासमोर !!” सुनंदा अश्रू पुसत बोलली.
अस म्हणताच सरपंच तावातावत श्यामला पलंगावरून उचलून घेत बाहेर अंगणात ठेवून आला.सुनंदा त्याला आडवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण सरपंच तिला ओढत पुन्हा खोलीत घेऊन गेला. वासनेच्या मदमस्त नशेत बुडण्यासाठी. एक माणूस राक्षस झाला, कित्येक बलात्कार झाले, पण त्या खोलीने आणि सूनंदाच्या घराशिवाय कोणी दुसऱ्याने पाहिलेच नाहीत.
दारू पिऊन रस्त्याने हत्ती चालावा तेव्हा त्याला काहीच कळत नाही. तो फक्त चालत असतो आपल्याच धुंदीत, तसच कदाचित वासनेची धुंदी नसानसात भिनलेली ही जमात फिरत असते. कित्येक वेळ ते पोर तसच बाहेर पडून होत जमिनीवर. आतमध्ये चाललेल्या त्या सगळ्या गोष्टींना अनभिज्ञ. पण आतून एक आई ओरडते आहे. पोरा मला माफ कर रे!! ही आई तुझ्यासाठी आपुरी पडते आहे!! माझं आईपण फक्त आता रडते आहे !! बाळा काळजी घेशील ना रे स्वतःची ??
सकाळ उजडली सरपंच दबल्या पावलांनी निघून गेला. सुनंदा पळत पळत श्यामकडे आली.त्याला जवळ घेत कित्येक वेळ रडु लागली.
“पोरा ,माफ कर रे मला!!! “श्यामच्या डोक्यावर आपले ओठ ठेवत सुनंदा म्हणत होती.
माझ्या सारख्या बाईला आईपण नाहीरे सहन होत!! ही आई !!माझ्यातील आई ,या माझ्या बाळाची आई मला एका दगडापासून पुन्हा स्त्री करते !! तुझ्यासाठीच भावना माझी तीळतीळ तुटते आहे रे !!! ”
श्यामच्या डोक्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली.
“अंग गार लागतय रे श्याम !! ताप पण गेला आता तुझा !! “सुनंदा श्यामकडे पहात म्हणाली. दरवाजाचा आवाज होताच ती पाहू लागली, आजी आतमध्ये येत होती.
“ये आजी बघ ना !! श्यामचा ताप पण गेला!! अंग गार लागतय त्याच !! ये श्याम आता तरी उठ !! बघ आता तरी आईकडे !! बघ या आईची काय अवस्था झालीय ते !!! उठ ना!!! सुनंदा श्यामकडें पहात बोलतच होती.
आजी सूनंदाचा जवळ आली.

क्रमशः …

✍योगेश खजानदार

Advertisements

Published by

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.