शब्दाचिया नावे …

“शब्दांचिया नावे उगाच दोष जातो
कवितेत एक भाव तूच आहेस
तुझेच आहे दिसणे यात
नी तुझेच आहेत भास यास
उगाच खाती भाव ती ओळ शब्दाची
त्यात सौदर्य ही तूच आहेस

एक लय येते बोलते ओठातून
सुरास शोधता फिरते नजरेतून
भेटता सुरू त्या कवीतेस
ते सुरू ही किती सुंदर आहेत
त्यातील एक गोडवा सखे तूच आहेस

ऐकावी पुन्हा पुन्हा वाचावी का पुन्हा
त्यात तुझ्याच असण्याची जाणीव आहे
वहीच्या पानास ही मोह वाचण्याचा
त्यास ही आस तुलाच पाहण्याची आहे
सखे त्या मनातील एक ओढ तूच आहेस

कधी राग आहे कधी प्रेम आहे
कधी भेटण्याची इच्छा आहे
कधी एकटा मी तर कधी तू सोबती आहे
कवितेतील तुला सांगू किती मी
कवितेचे कित्येक रंग फक्त तूच आहेस

शब्दांचिया नावे उगाच दोष जातो
कवितेत एक भाव तूच आहेस..!!”

✍योगेश खजानदार

स्वप्नांच्या पलीकडे …!!

स्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे

तुझ्या आठवणीच्या पडद्यावर
मनसोक्त एकदा फिरताना
झुळूक होऊन मला एकदा जायचं आहे

हरवून जाईल कधी ती सांज
ओल्या मनातील भावनेत
त्या भावनेतील ओल मला व्हायचं आहे

कधी एकांती, कधी तुझ्या सोबत
कधी अबोल, तर कधी खूप बोलत
तुझ्या गप्पांमध्ये मला हरवून जायचं आहे

ही दुनिया थोडी अतरंगी
तुझ्या आवडत्या रंगाने भरली
त्या रंगातील एक रंग मला बनायचं आहे

कधी दूर असेन ,कधी जवळ तुझ्या
साथ माझी असेल, कधी विरह असेन जरा
त्या विरहातील ओढ मला व्हायचं आहे

साथ तुझी द्यायला, सोबत माझी व्हायला
तुला आपलेसे करायला , मला तुझ्यात हरवून जायला
त्या घरात मला एकदा यायचं आहे..!!!
✍ योगेश खजानदार

नव्या वाटा…!!

नव्या वाटांच्या शोधात
पाखरांनी घेतली भरारी
उठ तूही आता
सोडून दे कालची काळजी

मुक्त फिरायला हे आकाश
बोलावते आहे तुजला आता
कोणता विचार मनात घेऊन
थांबला आहेस तू या क्षणी

सूर्याची ती किरणे
खुणावत आहेत तुला नव्यानी
उठ सज्ज हो आता
पसुरून ज्यांना दाही दिशी

त्या वाऱ्यासही पुन्हा आता
नव्या स्वप्नांची आस लागली
तुझ्या डोळ्यात एक वाट
नव्याने यावी त्यास दिसूनी

कोणती ही नवी आशा
सर्वत्र गेली पसरुनी
तुझ्या मनात आज नसावा
कोणताही कालचा राग मनी

ही नवी आशा ही नवी दिशा
बोलते आहे तुजला नव्याने
उठ तू आता पुन्हा
आणि सोडून दे कालची काळजी!!
✍योगेश खजानदार

विस्कटलेले नाते ..!!!

विस्कटलेले नाते !!! …

#Yks

कित्येक शब्दांची जुळवाजुळव करत तो तिला मनापासून मनवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही केल्या राग सोडायला तयार नव्हती.काय करावं असं म्हणतं तो कित्येक वेळ माझ्या सोबत बसला होता. खूप वेळ बोलण झाल्या नंतर मी त्याला रोज एक संध्याकाळी तिला मेसेज करायला सांगीतला. त्यामध्ये बाकी काही नाही फक्त त्याला आपल्या गोष्टी पुन्हा पहिल्या सारख्या व्हायला हव्या एवढंच लिहायला सांगितलं होत आणि शेवटी एक वाईट शब्द लिही अस निक्षून सांगितलं. तसे त्याने महिनाभर केले त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट तिने त्याला सगळीकडे ब्लॉक केले फोन रिसिव्ह करणे सोडून दिले.
महिना झाल्या नंतर मी दोघांनाही त्यांच्या नकळत मला भेटायला सांगितल. वेळ एकच पण दोघेही अचानक समोर येतील या गोष्टी पासून अनभिज्ञ. अचानक समोर एकमेकांना पाहून दोघेही गोंधळून गेले. तिला एवढं समजावून सांगूनही ती समजू शकली नाही या गोष्टीमुळे तोही थोडा चिडलेला. कारण व्यक्तीला समजून सांगूनही जर समजत नसेन तर आपल्याला त्या व्यक्तीचा राग यायला लागतो. तिने त्याच्याकडे बघून न पाहिल्या सारखे केले. थोडा वेळ जाऊ दिला आणि विषयाला हात घातला. तो म्हणाला आता मला तिला समजावून नाही सांगायचं . आणि ती म्हणाली मला आता त्याला बोलायचं नाहीये. दोघांचेही मत ऐकून घेतल्यावर मला त्यांना विचारावं वाटलं. गेला महिना याने तुला कित्येक मेसेजेस केले तरीही तुझा राग का गेला नाही?? तर तिचं एकच म्हणणे होते की त्याच्या प्रत्येक मेसेजेस मध्ये तो एकतरी शब्द वाईट बोलत होता. मी म्हटलं तुला याबद्दल विचारावं अस वाटल नाही ?? तर तिचा इगो दुखावला जाईल म्हणून ती काहीच बोलत नाही. म्हणजे नात कायमच तुटलं तरी चालेल पण इगो दुखावला नाही पाहिजे. पुन्हा मी त्याला विचारलं की मित्रा तू असा का करत होतास?? तर त्याच उत्तर अगदी अपेक्षित होत की तू म्हणालास म्हणून. दोघांच्या ही बाजू कित्येक वेळ ऐकून घेतल्या नंतर मी माझे मत मांडले.
खरतर दोघांच्या मध्ये तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप नात एकतर नीट करतो किवा उध्वस्त करतो. या दोघां बद्दल ही तेच झाल. मी म्हणालो म्हणून त्याने तिला रोज एक वाईट शब्द बोलत गेला. तिने त्याच्या मेसेजेस मध्ये फक्त तेच वाईट शब्द पाहिले पण त्याची तिच्या बद्दलची काळजी कधी पहिलीच नाही. दोघेही चुकत न्हवते पण नाते कुठे विसरले जाते आहे हे त्यांना कळलं नाही. कित्येक चर्चा अशाच घडत जातात. आपण नेहमी आपल्या नात्यामध्ये वाईट गोष्ट धरून ठेवतो जी पूर्ण नातं उध्वस्त करून जाते. नात हे खरतर दोघांच्या समजुतीने टिकते, ना की कोणाच्या सांगण्यावरून. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला कोण दुसऱ्याने सांगितले म्हणून वाईट म्हणणे खरंच चूक असते. खरतर यात त्याच काहीच चुकत नसते नात्यातील कित्येक गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातून नकळत घडून जातात. कोणीतरी म्हटलं म्हणून, किंवा कोणाकडे पाहून नात कधीच सुधारू शकत नाही.त्याला लागतात एकमेकांमध्ये विश्वासाचे धागे जे कोणीही कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू नयेत असे . अखेर दोघांनाही कळून चुकलं की नात्यात छोट्या छोट्या वाईट गोष्टी पहायच्या नसतात अशाने नात टिकवायचं अवघड होऊन बसतं. त्या छोट्या मेसेजेस ने त्यांना खूप काही शिकवलं. कोणीतरी सांगितल म्हणून आपल्या व्यक्तीला नाव ठेवायचं नसत हे त्यालाही कळून आले. बाकी नाती काय मनातून सुरू होतात आणि अखंड ओठातून बोलू लागतात .. अगदी अखेर पर्यंत … हो ना???

✍योगेश खजानदार

टीप: एक छोटा अनुभव share केला आहे.

अखेरचे शब्द…!!!

राहिले काहीच नसेन तेव्हा
माझा तिरस्कार ही करू नकोस
तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात
एक छोटी जागा मात्र ठेव

वेडावला असेन धुंद वारा
मुक्त झाल्या असतील भावना
तुला त्रास देण्यास तेव्हा
त्याला नको म्हणू नकोस

कधी येईल एक सर
तुला पाहण्यास सहज
त्या सरी मधे भिजण्यास
खूनावेल ते आभाळ असेच

सांग कशी असेल आपली
वाट पुढच्या एकांताची
माझ्या विरहात तू तेव्हा
स्वतः स हरवूशन जाण्याची

पण एक खंत आहे मनाची
शेवटच्या त्या शब्दाची
अबोल त्या तुझ्या मनास
उगाच दोष देऊ नकोस

काही उरले असेन कदाचित
ठेव जपून तळाशी
कधी अश्रू सोबत आलेच तर
माझ्या कवितेस तू वाचू नकोस !!
✍ योगेश खजानदार

बोलकी एक गोष्ट !!! 😊

अबोल या नात्याची
बोलकी एक गोष्ट आहे
मनातल्या भावनेस
शब्दांचीच एक साथ आहे

नजरेस एक ओढ
भेटीस आतुर आहे
मिटल्या पापण्यात
ओघळते अश्रू आहे

मला सांग ना
हे अंतर कोणते आहे
तुझ्या विरहात
कोणती हुरहूर आहे

नकोस जाऊ दुर
मनात एक सल आहे
तुझ्या असण्याचे
भास होत आहे

शब्दांचीया सवे
मी तुलाच शोधतो आहे
अबोल या नात्यास तेव्हा
पुन्हा बोलतो आहे

येशील परतुनी तू
हे शब्द सांगत आहे
माझ्या सवे राहून
तुलाच आठवते आहे

कसे हरवले हे नाते
वाऱ्यास पुसतो आहे
आठवणीच्या या जगात तुला
दाही दिशा शोधतो आहे

अबोल या नात्याची
बोलकी एक गोष्ट आहे !!!

✍योगेश खजानदार

कविता संसाराची!!

संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती

सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी
चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी

कधी कधी विसरून गेलो तर किती रागावते ती?
आहो विसरून गेलात म्हणून, संसारात बघा म्हणते ना मी

संसाराचा गाडा सुरळीत चालवतोच ना मी??
पण थोड लक्ष द्या म्हटलं तर कुठ बिघडल म्हणते मी ??

सकाळी उठून ऑफिसला जातोच मी ?
ऑफिसला जाताना न चुकता डबा देतेच ना मी.

खरंच सांग आता मला ,तुझ्या मनातल ओळखू कस मी ?
हे पाहिजे ते पाहिजे तुझ्या मागण्या किती ?

आता निघालाच विषय म्हणून सांगते आहे मी
घरातलं काही संपलं तर सांगायचं कोणाला मी

सारखं सारखं काहींना काही संपत कस म्हणतो मी ??
माझ्या माहेरचे येत नाहीत संपवायल सांगते बरं मी

संसाराच्या या कवितेत कशी बोलते बघा ती
आहो आधीच म्हणाले ना चुकलं काही तर माफी मागते मी

घरात बसून नुसती हुकुम सोडते बघा ती
घरातलं सार काम करते ,त्याच कौतुक करा म्हणते का मी

कष्ट करून पैसा कमावतोच ना मी

पैसा पैसा जोडून संसार सजवतेच ना मी

कसे असतात संसाराचे सुर सांगू कसे मी
कधी वाद कधी प्रेम यातच नेहमी सापडते मला ती

म्हणूनच संसारात कधी ते बोलतात कधी मी
प्रश्न त्यांचे असतात आणि उत्त्तर देते मी !!!

✍योगेश खजानदार