सुर्यास्त (कथा भाग -४)

माझ्या मनाचा थोडाही विचार का केला नाही समीरने, तो असा का निघून गेला. अशा विचारात सायली रात्रभर जागीच राहिली. सकाळच्या वेळी सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण तिला प्रतीक्षा होती ती समीरच्या शुभेच्छाची . संध्याकाळी सायलीच्या घरी सगळे जमले.
“काकु समीर??” सायली उस्कुतेने विचारू लागली.
“तो नाही आला, त्याला बर वाटत नाही म्हणाला!! ” आई सायलीकडे पहात म्हणाली.
“सायली घरातून बाहेर पहात गच्चीवर पाहू लागली. समीर गच्चीवर बसलेला दिसला. पण तो आला नाही. तुषार , सचिन सगळे आले. सायलीची आई तिला बोलावू लागली. सगळे मिळून तिचा वाढदिवस साजरा करू लागले. पण सायलीच मन काही त्यात लागतं न्हवत. तिच मन समीर का आला नाही यातच गुंतून राहील होत.
“सायली ,समीर नाही आला ते ??” सचिन सायलीला विचारू लागला.
“अरे त्याला बर वाटत नाही म्हणे!! ”
“सायली तुझा वाढदिवस आणि समीर नाही आला?? अस कस वागू शकतो तो?? ” सचिन तिच्याकडे पाहत ! म्हणाला.
” जाऊ दे अरे !! त्याला बर वाटत नाही म्हणून आला नाही तो!! बाकी काही नाही!!” सायली सावरासावर करत म्हणाली.
“काही नाहीं !! तो असाच आहे बघ!! कालच मला म्हणत होता , सायलीच्या वाढदिवसाला मला यायचं नाही म्हणून!! ”
“पण का असे !!” सायली अगदी मनातुन विचारू लागली.
“त्याला तुला बोलायचं नाही, म्हणत होता की सायली चांगली मुलगी नाही म्हणून!! मला तिच्याशी कोणतही नात ठेवायचं नाही !! ” सचिन एका वेगळ्याच उद्देशाने बोलू लागला.
“काय असा म्हणाला समीर ??” सायलीला सचिनच्या या बोलण्याने धक्काच बसला.
“हो!! तो म्हणे सायली माझ्या उगाच मागे मागे असते !! तिला काही कळतं नाही!! ” सचिन खोट्या शब्दाची एक रेष सायलीच्या मनात ओढू लागला.
“अस असेन तर मीही नाही बोलणार त्याला, मी वाईट आहे ?? तो बोललाच कस अस.
“जाऊ दे सायली आता हा विषय इथेच संपव!! आणि समीरशी बोलूच नकोस!!त्याचे विचार तुझ्याबद्दल चांगले नाहीत !! ” सचिन अगदी मनातली आग ओकत बोलू लागला.
सायली मनातुन पूर्ण उध्वस्त झाली. ज्या समीरला आपण एवढं मनापासून आपलं समजल तो माझ्या बद्दल असे बोलावा याचा तिला विश्वासाचं बसेना. ती कित्येक वेळ कोणाशी काहीच बोलली नाही. सगळे आलेले मित्र, समीरची आई सगळे निघून गेले. सायलीला तेही लक्षात आले नाही. एकांतात बसून ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. इकडे गच्चीवर सचिन आपल्या वहीत सायलीला शब्दांमधे लिहीत होता तिच्या असण्याला आपल्या शब्दात सांगत होता. त्या वहीची कागदे ते सगळं जड मनाने टिपून घेत होते..

“तुझ्या असण्याची जाणीव मला
ही हळुवार झुळूक का द्यावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी

हे फितूर झाले वारे मजला
कोणती ही आठवण यावी
तुझ्या सुंदर पानांच्या वहीत
एक ओळ माझी दिसावी

नसेल आज तुझ्या जवळ मी
कोणती ही सल मनात असावी
तुझ्या पासून दुर राहुन मी
स्वतःस आज का शिक्षा द्यावी

सांग वाऱ्यास या सारे काही
खोटी सारी गोष्ट असावी
तू दूर त्या किनारी तरी
माझ्या जवळ का भासावी!!!

समीर सारे काही मनातल त्या वहीत लिहिताना कित्येक वेळ तिथेच बसून होता. गच्चीवरून खाली येताच आईने त्याला सायलीकडे का आला नाहीस म्हणून विचारले असता त्याने काहीच न बोलता घरातून बाहेर निघून गेला. बाहेर जाताना सायली त्याला समोरच दिसली. पण यावेळी सायली समीरकडे पाहूनही न पाहिल्या सारखे करून निघून गेली. समीरला याच थोड नवल वाटलं पण त्याने याचा विचारही केला नाही.
आज कित्येक वर्षे मनातल सगळं सांगणारे ते दोघं एकमेकांना अनोळखी झाले होते. समीर बाहेर जाताना त्याला तुषार वाटेवरच भेटला.
“काय रे समीर!! आला नाहीस सायलीच्या वाढदिवसाला? ” तूषारचा ओठांवर वेगळेच हास्य होते.
“नाही अरे !! बरं वाटतं न्हवत म्हणून नाही आलो!! ” समीर तुटक बोलत होता. त्याला तूषारला बोलावं वाटत न्हवत.
“अरे सायली तर म्हणाली की तुला तिने सांगितलच नाही म्हणून!! ”
“जाऊदे अरे !! जातो मी!!” समीर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होता.
“अरे थांब रे!! काय भांडलास की काय सायलीशी!! मला म्हटली ही होती की फार भांडतोस म्हणून तिला!! भेटते मला ती तेव्हा सांगत होती!! ”
“मला याविषयी काही बोलायचं नाही !! तुषार मी जातोय.
समीर तिथून निघून गेला त्याला हे सारं नकोस झाल होत. समज गैरसमज आणि नात्यांच्या डावपेचात समीर आणि सायली हे नात कोमेजून जात होत.

क्रमशः

-योगेश खजानदार

Advertisements

Published by

Yogesh khajandar

लेखक

6 thoughts on “सुर्यास्त (कथा भाग -४)”

    1. धन्यवाद .. तुम्ही रोज कथा वाचता आहात हे वाचून आनंद झाला.. कथेचा शेवट नक्कीच तुम्हाला आवडेल .. 😊

      Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.