अंतर (भाग -२)

“त्यावेळीही असाच निघून गेलास आणि आजही माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच योगेश तु का निघून गेलास? मी तुषार बरोबर का निघून गेले हे तुला विचारावं असं का वाटतं नाही. त्या वेड्या मनातल प्रेम मी ओळखल होत रे!! पण माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणारा तुषार माझ्या सोबत होता. आणि त्याच प्रेम नाकारण्याची ताकद माझ्यात न्हवती !” प्रियाच्या मनात विचाराचं काहुर माजलं होत. योगेश गेल्या नंतर ही ती कित्येक वेळ तिथेच बसून होती. अखेर सर्व विचाराचा गोंधळ सोडून ती coffee shop मधून घरी आली. प्रियाची आई तिची वाटच पाहत होती. प्रिया काही न बोलता थेट आपल्या रूम मध्ये निघून गेली. हातात पेन घेऊन लिहू लागली. प्रिय तुषार, “माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाहीत. जणु मी पुन्हा पुन्हा जगतेय. तुझ्याचसाठी .!! मनातल सार त्या वही वर लिहून प्रिया कित्येक वेळ आपले अश्रू ढाळत होती. “योगेश तुझ्या कित्येक प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे न्हवती पण तुझ प्रेम मी ओळखु नाही शकले असे नाहीरे!!” प्रियाचे अश्रू जणु खूप काही बोलत होते. खूप वेळाने ती room मधून बाहेर आली. आईने सगळं काही ओळखल होत न राहवून ती बोलली “मनातल सार मनातच राहील की खूप त्रास होतो प्रिया!! तुषार तुझ्या आयुष्यात होता!! आणि योगेश वर तुझ मनापासून प्रेम होत हे कधीच तुझ्याकडून ही लपलेलं नाही!! पण त्याला ते कधी कळलंच नाही!! तुषार ने तुझ्याकडे प्रेम मागितल फक्त, तेही त्याच्या आयुष्याच्या अचानक झालेल्या सांजवेळी आणि तु त्याला नकार नाही दिलास. कारण त्यावेळी त्याला तुझी जास्त गरज होती!!” आई पुढे बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणाली. “आई आज coffee shop मध्ये योगेश भेटला होता!! आजही मला तो तसाच सोडून निघून गेला ज्यावेळी मी तुषार सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता!!” “आणि आजही तु त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असशील?” आई प्रियाकडे पाहत म्हणाली. “खूप प्रयत्न केला!! पण तो नाही थांबला!! प्रिया अश्रू आवरत म्हणाली. कित्येक वेळ प्रिया आईला मनातल सार सांगत होती. तूषारचा आठवणींत अडकून ती योगेशला शोधण्याचा प्रयत्न करत होती. तुषार तिच्या आयुष्यातलं एक सुंदर पान होत. जे अचानक गळून पडल होत. त्या पानावर खूप काही लिहिल होत. जे कधीही पुसता न येण्यासारखे होत. पण योगेश तर एक सुंदर कविता होती जी सतत ओठांवर येतं होती. योगेशला पुन्हा भेटण्याची ओढ प्रियाला खूप होती. पुढचे कित्येक दिवस ती रोज त्या coffee shop मध्ये जात होती. पुन्हा योगेश तिला भेटेल आणि यावेळी त्याला असाच निघून जाऊ नाही द्यायचं अस ठरवून रोज ती तिथे जात होती. आणि एक दिवस अचानक तिच्या समोर कोणीतरी येऊ बसले. तो योगेशच होता. प्रियाला त्याला समोर पाहून खूप आनंद झाला. “तुझी वाट पाहता पाहता रोज coffee प्यायची सवय लागली मला!!” प्रियाला मनातला आनंद लपवताच आला नाही. “तु रोज येतेस इथे? मी भेटेन पुन्हा म्हणून?? योगेश कुतूहलाने विचारत होता. “हो!!” पण का? “कारण कित्येक गोष्टीं आजही अधुऱ्याच आहेत! ज्या मनात आहेत तुझ्याही, आणि माझ्याही!! खूप काही मला सांगायचय !! खूप काही तुझ्याकडून ऐकायचं आहे !!! ” प्रिया त्या जुन्या नात्यास पुन्हा बोलकं करत होती. योगेशला मनातल सगळ काही सांगत होती!!! क्रमशः … -योगेश खजानदार

Advertisements

Published by

Yogesh khajandar

लेखक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.