नादान ये दिल 💗

image

दिल !!!! 💗 एक कविता !!!

#Yks

नादान सा जो दिल है
ये आज भी कुछ मांगता है
कहीं नीले आसमान के नीचे
खुद ही को क्यों धुंडता है

मिले सन्नाटे की ये पंक्तियां
जिसे कोन लिखता है
कहीं शोर मिले तो ये
क्यों अनसुना सा करता है
ना जाने ये दिल क्या पूछता है

बेवक्त की बारिश हो तो
भीग जाता है
दर्द मिले राह मै कहीं
तो दो पल ठहर जाता है
ना जाने क्या चाहता है

खुद को भूल जाता है
अपनोको ही याद करता है
जो देख कर भी अनदेखा करदे
उन्हिसे क्यों प्यार करता है
ये दिल बहुत सताता है

फिर भी ये संभल जाता है
अपनोके दर्द को भूल कर
अपनोसे प्यार करता है
रूठकर भी हसता है
ये दिल ये क्यों करता है

बाते ये बहुत करता है
फिर भी अपनी बात ये
अपनोसे क्यों न कहता है
ये दिल तू बहुत रुलाता है
आंखो से बहुत कुछ कहता है

हवा का झोका है ये  दिल
जो इस नीले आसमा के नीचे
चंचल होके घूमता है
कहीं हल्का सा झोका होके गुजरता है
तोह कहीं यादों का तूफ़ान उठा देता है

क्यों नादान सा ये दिल है
जो आज भी कुछ मांगता है

-योगेश खजानदार

image

Advertisements

राहून गेले काही !!!

image

राहून जातंय काहीतरी म्हणून
मागे वळून पहायचं नसतं
शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा
आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं

मन ऐकणार नाही हे माहित असतं
पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत
पण त्या वेड्या मनाला सांगूनही
कळूनही काही कळत नसतं

कारण काहीतरी पहायचं असतं
सावल्यातील चेहऱ्याला ओळखायचं असतं
हरवून गेलेल्या क्षणांना शोधताना
उगाच स्वतःही हरावयच  नसतं

तिथे अबोल कोणी सापडत ही असतं
त्याला उगाच बोलायच असत
विसरून गेलेल्या नात्याला तेव्हा
उगाच आसावत पहायचं नसतं

कुठे दुःख मिळालं तर कुठ सुख ही असतं
कधी हसू तर कधी रडु ही असतं
काही सुटलं हातातून तर काही मिळालं जेव्हा
हिशोब आयुष्याचा करताना हे पहायचं नसतं

शेवटी उरले काय पाहत असतं
मन वेड फिरत असतं
फिरून फिरून थकलेल्या मनाला
आठवणीच्या पावला शिवाय काही मिळत नसतं
-योगेश खजानदार

image

कधी कधी

image

कधी कधी मनाच्या या खेळात
तुझ्यासवे मी का हरवतो
तुला शोधण्याचा हट्ट इतका का?
की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो

तुला यायचं नाही माहितेय मला
तरी मी तुझी वाट का पाहतो
जणु कित्येक गोष्टींचं ओझ हे
कवितेत मी का हलके करतो

बघ ना एकदा येऊन पुन्हा माझ्याकडे
तुझ्याच आठवणीत मी कसा जगतो
तुझ्याच जगात राहून, तुझ्याच विना
तुलाच या वहीत कसा आठवतो

खरं खरं सांगू तुला सखे एक
तुला बोलण्याचे बहाणे मी कित्येक करतो
पण गालावरच्या तुझ्या रुसव्याचे
उगाच नखरे मी पाहत बसतो

तेव्हा सांग सखे येऊन एकदा त्या क्षणास
पुन्हा अश्रूंचे तो उगाच रिन करतो
पण तिथेच तु माझी आहेस हे
तोच मला पुन्हा पुन्हा सांगत असतो

भेटेशील मला कधी तू जणु
वाटेवरती उगाच मी वाट पाहत असतो
विचारून बघ त्या वळणानाही एकदा
तुझ्याचसाठी मी रात्रं दिवस जागत असतो

हे प्रेम कळेन कधीतरी तुला म्हणून
मी उगाच या वहीत लिहीत असतो
तुझ्या मनाच्या तळाशी तेव्हा मी
स्वतःलाच का शोधत असतो

-योगेश खजानदार

दिवाळीच्या सुट्ट्या आणि मी!!!

image

दिवाळीच्या सुट्ट्या आणि मी!!!

#Yks

  दिवाळी आली की घराकडे जायची ओढ लागायची. शिक्षणासाठी ,जॉब मुळे बाहेर राहत असलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट. मी पुण्यात होतो आणि माझ गाव बार्शी. दिवाळी जवळ आली की बार्शीला जायची ओढ व्हायची. मग काय दिवाळीच्या 4 ,8 दिवस आधी तिकडे जाणं व्हायचं. प्रत्येक वेळी काही तरी नवीन असा अनुभव ही सुट्टी द्यायची. थंडीची सुरुवात अलगद या दिवाळीचा सुखद आनंद द्यायची.

  या सुट्ट्या मधे कित्येक जुन्या मित्रांना भेटन व्हायचं. कोण पुणे , कोण कोल्हापूर,कोण मुंबई कुठे कुठे असायचे. त्यांचे तिथले अनुभव गोष्टी ऐकायला मिळायचे. सगळे बार्शीला आले की आमचे भेटायचे अड्डे सुधा ठरलेले , भगवंत मैदानवर सगळ्यांनी यायचं आणि तेही न चुकता. मग काय!!!  कित्येक गप्पा गोष्टी व्हायच्या , सगळ्यांचे कुठे काय चालू तेही कळायचे. गप्पा आणि चेष्टा मस्करी यात हे दिवाळीचे 8 दिवस कसे जायचे ते कळतही नसायचे.

  आईला मात्र हे दिवस म्हणजे मुलाला किती खायला देऊ असे. फराळाचं खायचं , आणि तिकडे मेस मधे नीट खायला मिळत नाही म्हणून रोज नवीन पदार्थ. असे हे दिवाळीचे दिवस म्हणजे नुसते मस्ती आणि धमाल. आधी लहानपणी सुट्ट्या मिळाल्या की मामाच्या गावाला जायचो आता स्वतच्या गावाला जाण होत. पण हे दिवस तितकेच आठवणीत राहणारे असतात. परत जाताना कित्येक गोष्टी सोबत घेऊन जातात. मनात एक ओल या सुट्ट्याची  नेहमीच राहते.

  आजही ह्या दिवाळीचे दिवस म्हणजे मनात पुन्हा आठवणीचा दिवा लावण्या सारखं असत.  आता कित्येक मित्र आपल्या कामात व्यस्त झालेत. काही मित्र तर बार्शीकडे येतही नाहीत असं कळलं.  दिवस बदलत गेले पण आठवणी मात्र तशाच आहेत. आता पहिल्या सारखे फटाके वाजवावे वाटत नाहीत. पण दिव्यांची आरास आजही मनात त्या मित्रास आठवते हे मात्र नक्की. कोण कुठे आहे हे आता शोधावं लागत. काळा नुसार सर्व बदलत जाते. तसेच झाले !!! आज दिवाळीच्या सुट्टीत काही जुने मित्र भेटले , पण काही कुठेतरी हरवले हे मात्र नक्की.

    पुन्हा परत जाताना या सर्व आठवणी सोबत असतीलच. तिकडे पुण्याला गेल्यावर पुन्हा पुढचे महिनाभर ही सुट्टी डोळ्या समोर राहते. मित्रांची उणीव भासत राहते. आईने दिलेला फराळ या पुण्यातल्या मित्रांसोबत खाताना पुन्हा त्या सगळ्या आठवणी आठवल्या जातात आणि मित्रही पुण्यातले त्यांच्या आठवणी सांगत कधी महिना उलटून जातो कळतच नाही. प्रत्येकाच्या आठवणी ज्याला त्याला अनमोल असतात. मला माझ्या बार्शी आणि दिवाळीच्या आठवणी मनात सतत बोलत राहतात. तर मित्रांना त्यांच्या गावाकडच्या !!! पुण्यातही या दिवाळीच्या सुट्टीची चर्चा होत होत दिवस असेच जातात. आईने दिलेले फराळ कधी संपून जातात कळतं ही नाही. मित्र भेटतात पण whatsapp नाही तर facebook वर .. पण जोपर्यंत ही सुट्टी चालू आहे तोपर्यंत ती मनसोक्त आनंदात घालवायची हे मात्र नक्की… हो ना !!!😊😊😊
-योगेश खजानदार

आली दिवाळी..!!

image

चकली गोलच का करायची
म्हणून पोट्टे विचारत होते
दिवाळी जवळ आली आता म्हणून
घरात फराळ बनत होते

शंकरपाळी मध्ये शंकर कुठे आहे
पोट्टे उगाच शोधत होते
आणि ताटभर चिवडा खाऊन
किल्ला बनवत होते

चिंगी, मंगी सगळेच आता
घरात दंग झाले होते
दिवाळी जवळ आली म्हणून
आकाशकंदील बनवू लागले होते

कुठे आजीची लगबग सुरू नी
खमंग वास दरवळू लागले होते
दिवाळीची सुट्टी लागली म्हणून
अंगणात पोट्टे नाचत होते

राजे तयार झाले किल्ल्यावर यायला
मावळे पाहणी करु लागले होते
किल्ले पुरंदर नी रायगड ही आता
दिव्याने उजळून निघाले होते

कोणती रांगोळी काढायची म्हणून
चिंगी नी मंगी भांडत होते
दिवाळीच्या सुरवातीस घर नुसते
भरून गेले होते

आईने तुळशीवृंदावन रंगवून
त्याला नवीन केले होते
बाबांनी पोट्ट्यासाठी तेव्हा
फटाके आणून दिले होते

दिवाळीचा सण हा आला
घर साऱ्या आनंदाने उजळत होते
दिवांच्या प्रकाशात ही न्हावून जाण्यास
हे आकाशही तयार होत होते!!!
-योगेश खजानदार

image

image

एकदा तु सांग ना!!!

आज जागतिक कन्या दिनानिमित्त ही कविता ..एक मुलगी आपल्या आईस बोलते ..!!

या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना
मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना
ती पावलं माझी घरभर फिरतील
मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना

बाबा म्हणणारी ती त्याच्यावर मनसोक्त जीव लावणारी ती
तुझ्यातील एक मी तु हरवतेस का सांग ना
तूही एक स्त्रीच आहेसं मग एका स्त्रित्वाला
प्रत्येक वेळी हरताना पहायचंय का सांग ना

हीच खुडणारी हाते लक्ष्मी देखील म्हणतात मला
दुर्गा म्हणून उगाच पूजतात का सांग ना
त्याचं देवीचा गळा घोटून त्याचं हाताने मग
कोणती लक्ष्मी पूजनार आहेस सांग ना

बरं पण गुन्हा काय माझा तो तरी सांग ना
मुलगी झाले हाच गुन्हा का माझा
जन्मास येताना दोन घराचं नात जोडताना
अधिकारच काय यांचा माझ्या पावलांना खुडायचा, तो तरी सांग ना

नात्यांमध्ये येताना कित्येक रूप आहेत माझी सांग ना
मी आई आहे,मी बहीण आहे , मी बायको ही आहे
मी प्रेम आहे , मी माया आहे , मी आठवण ही आहे
मग माझा सगळे तिरस्कारच का करतात सांग ना

माझ्या सोबत राहून तु माझी साथ देशील का सांग ना
माझ्या स्वप्नांना आता पंख देशील का सांग ना
तुझ्यातील मी एक स्त्री जणु हाक देत आहे तुला
मला आता मनसोक्तपणे बहरू देणार आहेस का सांग ना
-योगेश खजानदार

तुला लिहिताना..!!

image

‘तुला लिहिताना..!!’

#Yks

“मनातल्या तुला लिहिताना
जणु शब्द हे मझ बोलतात
कधी स्वतः कागदावर येतात
तर कधी तुला पाहुन सुचतात

न राहुन स्वतःस शोधताना
तुझ्या मध्येच सामावतात
कधी तुझे नाव लिहितात
तर कधी कवितेत मांडतात

का असे वेडे नयन हे
शब्दा सवे हरवतात
कधी मलाच न भेटतात
तर कधी तुलाच न शोधतात

सांग सखे काय करु
तुलाच न सांगतात
कधी वही मध्ये लिहितात
तर कधी ह्रदयात कोरतात

मनातल्या तुला लिहिताना
जणु भाव हे मझ बोलतात
कधी क्षणात तुला पाहतात
तर कधी तुझी साथ मागतात..!”
-योगेश खजानदार