नातं

आयुष्य जगताना कधी कळतच नाही की आपण पुढे जाताना कधी कुठे कोणी दुखावले तर नाही ना? खुप काही बोलताना कोणाला शब्दानी लागलं तर नाही ना ? की नातं टिकवताना दुसरा कोणी रूसला तर नाही ना ? कित्येक गोष्टी अशा असतात ज्यांचा आपण कधी विचारच करत नाहीत. सुटतात काही गोष्टी ज्या पुन्हा कधी भेटतही नाहीत. खुप पुढे गेल्यानंतर त्या गोष्टी लक्षात आल्या तरी वेळ निघुन गेलेली असते. मग उरतो काय तर फक्त तिरस्कार. पण असं होतं ना!! जवळच्या व्यक्तीने कितीही दुखावलं तरी तिरस्कार मात्र आपण कधी करुच शकत नाहीत, हेही तितकंच खरं असतं. पण नातं पुन्हा जुळायला वाट थोडीच पहावी लागते. ते तर कधीही जुळु शकतं. फक्त आपली भावना निर्मळ हवी. दुखावलो , रागवलो , चिडलो तरी नातं मात्र तसंच हव अगदी कधीही न तुटण्या सारखं. त्यात स्वार्थ नसावा, खोटेपणा नसावा . फक्त असाव ते एक गोड नातं. खुप विचार करावा असंही नातं काय उपयोगाचा!! नाही का??
आपल्यामुळे कोणाला त्रास तर होतं नाही ना याचाही विचार करायला हवा. कारण कित्येक गोष्टी या आपण कोणावर लादत तर नाहीत ना याचाही विचार केला पाहिजे. उगाच बळजबरी म्हणुन नातं कधीच टिकु नये त्यात समजुदारपणा हवाचं. शिवाय नातं हे एका बाजुने कधीच टिकत नाही. त्यासाठी दोन्ही बाजुने तेवढाच समतोल हवा. कारण एकाचाही तोल गेला तर नातं हे ताणलं जातं आणि त्रास दोघांनाही होतो.
पण नातं जुळवायचं म्हणजे समोरचाही नातं पुन्हा सुरू करायला तयार असावा. कारण आयुष्यात पुढे गेल्यानंतर काहींना आपला भूतकाळ नको असतो. तो खोडता तर येतं नाही पण पुन्हा समोर यावा अस नको असतं मग कराव तरी काय? जुन्या या नात्याला असंच सोडुन द्याव? तर अजीबात नाही आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला बोलत नसलो किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ आजही नसली तरी नातं हे संपत नाहीच ना. त्या नात्याची काळजी तुम्ही स्वतः घेऊच शकता. फक्त त्या व्यक्तीला आपला त्रास होता कामा नये. पण आपलं मन खरंच त्या नात्याला टिकवतं असेल जिवंत ठेवतं असेल ना तर ती व्यक्ती पुन्हा सर्व विसरून नक्कीच आपल्या आयुष्यात येईल हे नक्कीच.
शेवटी नातं हवं तरी कशाला असतं. आपलंस अस कोणीतरी वाटायला. आपल्या सोबत मनसोक्त आनंद लुटायला. कधी रडावंस वाटलं तरी सोबत जवळ बसायला. अगदी आयुष्यभराची साथ द्यायला हवी असतात ना ही नाती मग हे टिकवताना कशाला उगाच रुसायचं. झालं ते अगदी तिथेच विसरुन जायचं. कारण कधी कोणतं नातं हे कायमची आठवण होऊन जाईल ते कसं सांगायचं. पुन्हा हुरहुर कशाला काहीतरी मनात राहिल्याची. आणि कशाला गुंतागुंत या नात्याची ..

नातं असावं एक सुंदर
वेलीवरच्या फुलांसारखं
उमलावं ते अगदी अलगद
मनातल्या भावना सारखं

वाटतं ना असं की नातं हे एक सुंदर वेलीसारखं असावं. उमलावी ती कळी नात्याची जणु की उघडावी दारे मनाची. नातं हे असच असतं फुलासारख नाजुक. ते उमलु द्यावं लागतं त्या विश्वासाच्या वेलीवर. तरंच त्या फुलांचा त्या नात्याचा सुगंध आनंद देऊन जातो.

सुगंध हा दरवळे असा का
मनास खेचे फुलापाखरा सारखं
ओढं त्या वेड्या फुलाची
पहावे त्यास वाटते सारखं

एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं राहतं. कारण नातं हे प्रेमच देत राहतं. अगदी कायमं. म्हणुन नातं हे आयुष्यात खुप गरजेचं असतं. मग ते नातं कोणतही असो. कारण आपल्या व्यक्ति शिवाय हे आयुष्य शेवटी अधुरच असतं.

सुकता ते वेलीवरच फुलं
आठवणचं देऊन जातं
राहतं काय मनातं तर
ते वेडं हातात सुगंध ठेवुन जातं…!!! हो ना?

– योगेश खजानदार

Advertisements

तुझ्यात मी ..!!

समोर तु असताना
तुझ्यात मी मिळून जाते
तुझ्यासाठी कविता लिहिणारे
ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते

शोधते मी स्वतःस कुठेतरी
तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते
तुझ्याकडे पाहतंच राहावे
मन का मज ते सांगत राहते

डोळ्यात तुझ्या पाहताच
तुझ्याकडेच का ओढली जाते
मिठीत तुझ्या यावे आज
ती रात्र का बोलत राहते

सख्या मनातले माझ्या
मनातच का आज राहुन जाते
तुझ्यावरचे प्रेम ते माझ्या
अबोल ओठांवरच का राहते

समजुन घे ना मनास या
डोळ्यांनी ते खुप बोलुन जाते
मिठीत तुझ्या तेव्हा ते
तुला घट्ट धरून राहते

आणि तु समोर असताना
तुझ्यातच मी मिळून जाते
-योगेश खजानदार

तुझ्यात मी

समोर तु असताना
तुझ्यात मी मिळून जाते
तुझ्यासाठी कविता लिहिणारे
ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते

शोधते मी स्वतःस कुठेतरी
तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते
तुझ्याकडे पाहतंच राहावे
मन का मज ते सांगत राहते

डोळ्यात तुझ्या पाहताच
तुझ्याकडेच का ओढली जाते
मिठीत तुझ्या यावे आज
ती रात्र का बोलत राहते

सख्या मनातले माझ्या
मनातच का आज राहुन जाते
तुझ्यावरचे प्रेम ते माझ्या
अबोल ओठांवरच का राहते

समजुन घे ना मनास या
डोळ्यांनी ते खुप बोलुन जाते
मिठीत तुझ्या तेव्हा ते
तुला घट्ट धरून राहते

आणि तु समोर असताना
तुझ्यातच मी मिळून जाते
-योगेश खजानदार

मनातील प्रेम

मनातले सांगायचे कदाचित
राहुन गेले असेनही
पण डोळ्यातले भाव माझ्या
तु वाचले नाहीस ना

हात तुझा हातात घेऊन
तुला थांबवायचे होते ही
पण तु जाताना तुझा हात
मी सोडला नाही ना

सांग प्रिये दुर तु असताना
तुला भेटायचे राहिले असेनही
पण जवळ तु असताना माझा मी
माझ्यातच राहिलो नाही ना

अबोल राहून प्रेम करताना
मन हे तुला बोलले असेनही
पण कधी ते तुझेच नाव घेताना
तु ऐकले नाहीस ना

हे प्रेम मनातील माझ्या
तुझ्यासाठीच फक्त होते
पण तुला ते सखे कधी
कळलेच नाही ना
-योगेश खजानदार

वेडी प्रित ..

आठवणींचा समुद्र आहे जणु
तु सतत लाट होऊन का यावीस
कधी मन ओल करुन माझे
तु पुन्हा का परतावी

वार्‍यासवे कधी वाहताना
मी तुझी वाट त्यास सांगावी
ती प्रत्येक झुळुक तेव्हा
तुझा भास होऊन का यावी

कधी त्या रात्रीस उगाच मी
तुझी वेडी आस का लावावी
तुला भेटण्यास तेव्हा त्या
चंद्राने ही वाट का पहावी

तुला शोधण्यास आज ती
वेडी रात्र का निघावी
तुझ्या सावल्यांची तेव्हा ती
उगाची खुण का शोधावी

सांग सखे का असे ही
वेडी प्रित मी जपावी
तु नसताना या मनाची
कोणी समजुत घालावी
-योगेश खजानदार

स्वातंत्र्य की स्वैराचार

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप आधुनिक आहे असे म्हणारेच लोक कदाचित या दोन्ही गोष्टी मध्ये कुठेतरी गोंधळून जातात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि स्वैराचार म्हणजेच स्वातंत्र नव्हे हेही समजुन घेणे आता गरजेचे आहे.
आमची मुल खुप आधुनिक विचारसरणीची आहेत अस म्हणत जेव्हा आपल्या मुलांना आई वडील हवं तेवढं स्वातंत्र देतात तेव्हाच त्यांना सांगण गरजेच असतं की स्वातंत्र आणि स्वैराचार यात फरक असतो. तुम्ही कुठे आणि कोणाच्या संगतीत वाढता याही गोष्टी यावेळी लक्षात घेणं खुप महत्वाचं असतं. जेव्हा 4 वर्षाची चिमुरडी पोरं कोणत्याही फिल्म मधला संवाद मोठ्या अभिमानाने म्हणतात तेव्हा नक्कीच आई वडिलांना आनंद होतो पण हीच खरी सुरुवात आहे का? हाही प्रश्न तुमच्या मनात येणं खुप गरजेचं असतं. मग पुन्हा मुल स्वैराचारी वागतात तेही असंच काहीस पाहुन. नक्की हे संस्कार होतात की स्वैराचार पणे वागण्याची एक पायरी.. तेच कळत नाही. नंतर मुल मोठेपणी आईवडिलांशी उद्धटपणे वागतात ते हेच अस काहीस पाहुन. हा झाला एक भाग.
  आपल्या आजच्या समाजात खरंच आदर्श बदलतायत का हेही पहावे लागेल?? कारंण कित्येक सराईत गुंड आणि गुन्हेगार हेही आता आदर्श होतायत हे पाहुन खरंच नवलं वाटतं. कित्येक गुन्हे करुन समाजात ताठ मानेने वावरणार्या गुंडासमोर कित्येक लोक झुकतात ते कशासाठी?. पण समाजासाठी लढणाऱ्या लोकांना आज कोणी पाठिंबा देतोय का? खरंच विचार करायला लावतात या गोष्टी.  इतिहास घडला कारण त्यावेळेस समाज आदर्श महान पुरुषांच्या मागे उभा राहिला. गुंडाच्या नव्हे. असे कित्येक विचार आहेत आणि त्यांचा आता गांभीर्याने विचार करण गरजेच आहे. नाहीतर उद्याचा समाज गुंडाचे पुतळे रस्त्यात एक आदर्श म्हणुन उभा करणार नाहीत हे कशावरुन.
खूप विचार करायला लावणारे हे मुद्दे आता काहीना पटणार नाहीत पण हेच सत्य आहे. आधुनिक विचार म्हणता म्हणता आपण खरंच त्या विचारांचे आहोत का हेही पहावं लागेल. कारण सुधारणा ही झालीच पाहिजे आज आमच्या सारख्या तरुण पिढीच्या फक्त अभिमानातच आदर्श पुरुष राहिलेत आणि मनात चोर, गुंड, गुन्हेगार याचे विचार. आणि हेच सत्य आहे.
  स्वातंत्र सर्वानाच हवं असतं पण एक अंकुश हवाच नाहीतर उद्याचा समाज फक्त स्वैराचार शिकवेल यात काहीच शंका नाही. तुमचे विचार आधी बदलावे लागतील नाहीतर दिलेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार व्हायला वेळ लागणार नाही हेही तितकंच खरं आहे. नाहीतर उद्या तुमच्या जवळची व्यक्ती गुंड होण्याची स्वप्ने पाहु नये म्हणजे झालं. यावरुन आपले विचार स्वतंत्र नसुन स्वैराचारी झाले आहेत हे कळत.
अगदी मला वाट्टेल ते मी करेन अस म्हणणारा समाज नक्कीच स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय की गैरफायदा हेही आता कळायला हवं. माणसाला स्वातंत्र हवच तो त्याचा हक्क आहे पण स्वातंत्र्यातही बंधने हवीच . बंधने मोठ्याच्या आदराची, बंधने आदर्श विचारांची , बंधने समाजाच्या कल्याणाची अशी बंधने हवीच अशाने स्वातंत्र टिकुन राहत आणि स्वैराचार मनाला शिवतही नाही. तुम्ही ठरवायच की आपला आदर्श कोणं ते.. कारण आदर्शावरुनच विचार ठरतात आणि विचारावरुनच माणुस चांगला वागतो ..नाहीतर स्वैराचारी होतो..

एक तु… 

त्या वार्‍यानेही तुला छळावे
सतत तुझे केस उडावे
तु त्यास पुन्हा सावरावे
तरी तो ऐकत नाही ना

बघुन एकदा तुला जावे
पुन्हा पुन्हा परतुन यावे
तरी त्या पानांस आज
करमत नाही ना

सांग सखे फुलास आज तु
हसले का ते बघ नीट तु
समोर तु येताच त्याच्या
ते प्रेमात तर पडले नाही ना

कसे हे घुटमळने फुलपाखराचे
सतत वेड तुला पाहण्याचे
तुझ्या जवळ येऊन ते
काही बोलले तर नाही ना

ही सांजवेळ बघते काय ती
ही मावळती लाजते का ती
थांबलेल्या त्या क्षणात आज
ती तुला साठवत तर नाही ना

तुलाच पाहुन हसताना ती
तुझ्याच जवळ असताना ती
माझ्याच मिठीत तुला पाहुन
ती रात्र झोपली तर नाही ना..
-योगेश खजानदार