भारत देश है मेरा!!!

आज गणतंत्र दिवस ..त्या निमित्ताने एक कविता ..

येसा देश है मेरा

हा यही तिरंगा है मेरा
भारत देश है मेरा
कणकण में बसता है
विभिन्नतओ का देश है मेरा

सम्मान है मेरा
भाषाओं में अनेक है देश मेरा
भिरभी जो एक है ऐसा
जग में महान है देश मेरा

रंगों का देश मेरा
त्योहारों का हे देश मेरा
फिरभी जो अटूट बंधन है
ऐसा मजबूत देश है मेरा

गर्व से ऊंचा सम्मान मेरा
मन मे बसा हुआ देश है मेरा
सबसे उपर फहराया झंडा
येसा भारत देश है मेरा

-योगेश खजानदार

Advertisements

जिद्द

नव्या वाटांवर चालताना
मी अडखळलो असेन ही
पण जिंकण्याची जिद्द
आजही मनात आहे

सावलीत या सुखाच्या
क्षणभर थांबलो असेल ही
तळपत्या उन्हात चालण्यास
आजही मी समर्थ आहे

कधी सोबती माझ्या
कोणी वाट चालेलही
पण एकांतात थांबण्यास
आजही मी निडर आहे

त्या मार्गावरून कदाचित
मी कुठे चुकेलही
पण पुन्हा मार्ग शोधण्यास
आजही मी खंबीर आहे

त्या जिंकण्याची मशाल
मझ आता खुणावते ही
पण त्यासाठी लढण्यास
आजही मी तयार आहे

– योगेश खजानदार

वहीच्या पानांवर…!!!

जुन्या वहीच्या पानांवर
आज क्षणांची धुळ आहे
झटकून टाकावी आज
मनात एक आस आहे

कधी भरून गेली ती पाने
आठवणींचे गावं आहे
कालचे ते सोबती मज
पानांवर दिसतं आहे

कोणी दिली साथ खुप
कोणी क्षणिक सोबती आहे
वहिच्या या नायकाची
ही कथा सुंदर आहे

कधी जिंकलो ते क्षण
पराजित ही झालो आहे
मनास नाही कोणती खंत
जगणे याचेच नाव आहे

काही क्षण हसवून ही गेले
ते हास्य ओठांवर आहे
काही क्षण रडवून ही गेले
ते अश्रु पानांवर आहे

जुन्या वहीच्या पानांवर
आज क्षणांची धुळ आहे !!!

-योगेश खजानदार

विरहं… !!

ती रात्र खुप काही सांगत होती. खिडकीतून बाहेर बघत मानसी एकटक लुकलुकत्या तार्‍यांकडे बघत होती. मनात विचारांचा नुसता गोंधळ झाला होता. तेवढ्यात किरण खोलीत येत मानसीचे ते रुप न्याहाळु लागला. तिच्या जवळ जात तो तसाच उभा राहिला. त्याच्याकडे न पहाताच ती त्याला म्हणु लागली’किरण या आकाशतल्या चांदण्याच खरंच मला कौतुक वाटतं!!’

‘का बरं?’ किरण ही त्या चांदण्याकडे पाहु लागला.

‘बघ ना इतक्या दुर असुनही कसे ते आपलेसे वाटतात. यामध्ये कुठतरी आपणही हरवलो आहोत याची जाणीव करतात. पण तरीही कधी ते परके असे वाटतंच नाहीत. प्रत्येक चांदणी आपल्याशी काहीतरी बोलतेय असं वाटतं.’ मानसी मनातल सगळं सांगु लागली.

‘मानसी काय झालंय सांगशील का?’

‘काही नाही रे, असच वाटल म्हणुन म्हटले, पण बघ ना नात्यांच ही असच असत ना? म्हणजे प्रत्येक नातं हे एक चांदणी सारखं असतं, आपल्या आयुष्यात ते सतत लुकलुकत असतं , कधी दिसेनास होतात तर कधी लख्ख प्रकाश पाडतात अगदी पौर्णिमेच्या चांदण्यान सारखं. आणि कधी अचानक नकळत तुटुनही जातात.’

मानसी डोळ्यातल पाणी टिपत म्हणतं होती.

‘पार्थ ची आठवण येतेय?’

‘नाही रे , पण आजही तो आपल्यात आहे असच वाटतं, कोणत्याही क्षणी तो आई म्हणतं माझ्याकडे येईन आणि मला बिलगुन त्या डब्यातला खाऊ दे म्हणुन हट्ट करेन असं वाटतं.’

‘मानसी आता पार्थला विसरायला हवं!’

किरणच्या या वाक्या सरशी मानसी पुर्ण कोसळली, तिला काय बोलावं तेच कळेना. किरणच्या कुशीत जाऊन ती कित्येक वेळ आसवे गाळत होती. त्या चांदण्यात आपल्या बाळाला शोधत होती. पण एक चांदणी केव्हाच तुटुन गेली होती अगदी कायमची.

‘किरण आपला पार्थ कधीच कारे येणार नाही?’

‘मानसी आपला पार्थ आपल्या जवळच आहे, आपल्या मनात , आपल्या आठवणीत अगदी कायमचा.

मानसी आता स्वतःला सावरते झाली. किरणच्या खांद्यावर डोक ठेवुन कित्येक वेळ ती आकाशातल्या चांदण्या पहात राहिली. मनात पार्थला साठवत राहिली अगदी पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे लख्ख.

कुठेतरी आजही
तुझी आठवण कायम आहे
त्या चांदण्या मध्ये मी तुला
का उगाच शोधते आहे
अश्रुचा हा सागर जणु
मला का आज बोलतो आहे
आठवणींच्या लाटां मध्ये
तु कुठे हरवला आहे
येशील का रे आज पुन्हा
ही ओढ मझ अनावर आहे
तुझ्यासाठी मी पुन्हा
तिथेच येऊन उभी आहे
तुटलेला हा तारा जणु
क्षणभर का थांबला आहे
माझी आठवणही त्याला
कदाचित येत आहे
-योगेश खजानदार

जगणे..!!

कधी आयुष्य जगताना
थोड वेगळ जगुन पहावं
येणार्‍या लाटांच्या
थोड विरुध्द जाऊ द्यावं

श्वासांचा हिशोब तर होईलच
पण प्रत्येक श्वासात
खुप जगुन पहावं
कधी रडताना तर कधी हसताना
मन मोकळं करुन जावं

चांदणे मोजण्याचा उगाच
हट्ट करुन बघावं
पाऊसात कधी तरी
चिंब भिजून जावं
वाळूवरती बसुन एकदा
तो सुर्यास्त पहावं

समुद्राकडे पाहून उगाच
आठवणींच गलबत दिसावं
जगणं हे असच असत
थोड जाणुन घ्यावं
आणि मन उगाच म्हणते
आयुष्य जगताना
थोडं वेगळं जगुन पहावं
– योगेश खजानदार

एक कळी… !!

एकदा वेलीवरची कळी
उगाच रुसुन बसली
काही केल्या कळेना
फुगून का ती बसली

बोलत नव्हती कोणाला
पाना मागे लपुन बसली
हसत नव्हती कशाला
अबोल होऊन बसली

सांग तरी काय झाले
का रुसुन बसली
बोलना आता एकदा तरी
कशासाठी फुगुन बसली

काही केल्या बोलेच ना
पंचाईतच होऊन बसली
कशी उमलेल ही कळी
चिंताच होऊन बसली

पाने , कळ्या , वेलीवरची
सगळे मनवुन बसली
काही केल्या हसेच ना
उगाच रडत बसली

वेलीवरची ती कळी
एकटीच जाऊन बसली
पण काही केल्या कळेना
रुसुन का ती बसली … !!
– योगेश खजानदार

मुसाफिर

कदाचित त्या वाटा ही
तुझीच आठवण काढतात
तुझ्या सवे चाललेल्या
क्षणास शोधत बसतात
पाऊलखुणा त्या मातीतून
भुतकाळाची साक्ष देतात
एकट्या या मुसाफिरास
तुझीच साथ मागतात
तु पुन्हा फिरुन यावंस
हीच वाट पहातात
आणि थांबलेल्या मला
पुन्हा तुझीच ओढ लावतात
येईल वारा ऊन नी पाऊस
कसली चिंता करतात
तुझ्या सवे हा जीवन प्रवास
सगळं काही सहन करतात
त्या वाटा आता पुन्हा
मला तुझ्याच जवळ आणतात
एकट्या या मुसाफिरास
पुन्हा साथ तुझीच मागतात
-योगेश खजानदार