राग

“तिने रुसुन बसावे
मी किती मनवावे
नाकावरच्या रागाला
किती आता घालवावे

उसण्या रागाचे बघा
किती नखरे पाहावे
जवळ जाताच मी
तिने दुर निघुन जावे

बोलतात ते डोळे
मनास कोणी सांगावे
मी रुसली आहे बरं
तिने मला का सांगावे

तरी सुटेना हा प्रश्न
तिला कसे बोलावे
कुठे असेन ते हास्य
पुन्हा ओठांवर आणावे

हास्य शोधताना मला
तिने उगाच का पहावे
आणि नाकावरच्या रागाने
हळुच मग हसावे

उसण्या रागाचे बघा
किती नखरे पाहावे…!!””
– योगेश खजानदार

Advertisements