मला शोधताना

मला माझ्यात पाहतानातु स्वतःत एकदा शोधुन बघ

डोळ्याच्या या पापण्यांन मध्ये

मला एकदा सहज बघ

मी तिथेच असेन तुझी वाट पहात

मला एकदा भेटुन बघ

मनातल्या भावनांना

ओठांवरती आणुन बघ
मला माझ्यात पहाताना

स्वतः एकदा ह्रदयात तु बघ

लपवते ते काय तुझ्याशी

एकदा तु ऐकुन बघ

छेडली ती तार कोणती

सुर तु जुळवून बघ

भेटेल ते गीत तुला

शब्द माझे तु बनुन बघ
मला माझ्यात पहाताना

स्वतः एकदा आठवणीत बघ

तुझ्या गोष्टीतील मला एकदा

चित्रांन मध्ये रंगवुन बघ

अधुरे असेल चित्र तेही

स्वतःसही तु रंगवुन बघ

आठवणीतील मी भेटेल तुला

डोळे एकदा मिटुन बघ
मला माझ्यात पाहताना

तु स्वतःत एकदा शोधुन बघ… !.

– योगेश खजानदार

Advertisements