मातृदिन

आईसाठी लिहिलेल्या माझ्या काही कविता ..

#Yks
1. शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप

मझ घडविले तु
हे संसार दाखविले
तुझ सम जगात
दुसरे न प्रतिरूप

निस्वार्थ तुझे प्रेम
आई देवाची प्रतिमा
तुझ चरणी मस्तक
मझ विश्वची अनुरुप
– योगेश

2. मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई

चुकल ते समजावणारी आई
योग्य मार्ग दाखवणारी आई
आपल्या ध्येयाकडे चालताना
खंबीरपणे बरोबर उभी ती आई

कधी रागावणारी ती आई
प्रेमान जवळ घेणारी ती आई
संस्कारांना घडवताना
कठोर होणारी ती आई

आपली काळजी करणारी आई
आपली वाट पाहणारी आई
काळीज जिचं आपल्याच साठी
ह्रदयात रहाणारी ती आई
–  योगेश

3. आईबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे.  अस म्हणतात देवाचं दुसरं रुप म्हणजे आई … आई फक्त तुझ्याचसाठी ….

“आई, खरचं तुझी मला आठवण येते

तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.

तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते.

तुच घडवले मला
तुझेच हे संस्कार
यशाच्या शिखरावरही
आई, खरचं तुझी आठवण येते.

तुझी माया खरंच कळत नाही
तुझे रागावणे आणि प्रेम
यातला फरकंच कळत नाही
तुझ्या आठवणीने
क्षणोक्षणी येते भरुन मन
तुझ्या मायेचे
कधीच उपकार फेडु शकत नाही.

म्हणुनच आई, खरचं तुझी मला आठवण येते.
– योगेश

आज Mothers day निमित्त या कविता खास आईसाठी … #Yks   #योगेश_खजानदार

Advertisements

आई

मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई

चुकल ते समजावणारी आई
योग्य मार्ग दाखवणारी आई
आपल्या ध्येयाकडे चालताना
खंबीरपणे बरोबर उभी ती आई

कधी रागावणारी ती आई
प्रेमान जवळ घेणारी ती आई
संस्कारांना घडवताना
कठोर होणारी ती आई

आपली काळजी करणारी आई
आपली वाट पाहणारी आई
काळीज जिचं आपल्याच साठी
ह्रदयात रहाणारी ती आई