प्रेमात पडल ना की असच होतं

प्रेमात पडल ना की असच होतं

आकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं
धडधडनार ह्रदय ही दिल होतं
तासन तास वाट पहान झुरन होतं
भान जान म्हणजे आठवणीत रमण होतं
प्रेमात पडल ना की असच होतं

मन म्हणजे प्रेमाच व्यासपीठ होतं
स्वप्न म्हणजे दुसर जगचं होतं
राग म्हणजे आता रुसन होतं
मागे फिरणे आता ओढ लागणं होतं
प्रेमात पडल ना की असच होतं

हसणं सुद्धा स्मितहास्य होतं
बघणं सुद्धा डोळ्यांची खुण होतं
रडणं ही आता अश्रुंची धार होतं
दुख ही आता वेदना होतं
प्रेमात पडल ना की असच होतं

लिहिणं म्हणजे मनमोकळ होतं
मन भरून येणं आता ह्रदय दाटून होतं
चार ओळीही आता चारोळी होतं
मनातलं प्रेम आता कवितेत व्यक्त होतं
प्रेमात पडल ना की असच होतं

Advertisements

मन स्मशान

जळाव ते शरीर दुखाच्या आगीत
मरणाची सुद्धा नसावी भीती
पिशाच्च बनावं स्वार्थी दुनियेत
माणुस म्हणुन नसावी सक्ती
पडावा विसर त्या विधात्याला
कोणाची आता वाजवावी किर्ती
हे दुःख व्हावे असह्य आता
अश्रु रक्ताचे डोळ्यात दिसती
हा कोणता त्रास कळला कोणास
कुठे असेल यास मुक्ती
मन हे स्मशान जळती कायम
विचारांची इथे राख दिसती
आपलेच आपल्यात असुन नाहीत
ही आग मनात का पेटती
एकांत माझा एक चिता ती
स्वार्थी दुनियेत कायम जळती

माझे मन

माझे मन का बोलते
तु आहेस जवळ
वार्‍यात मिसळून
सर्वत्र दरवळत
कधी शोधले तुला मी
मावळतीच्या सावलीत
तु मात्र आहेस
मिटलेल्या कळीत
पुन्हा का पहावे
तु आहेस ओंजळीत
हलकेच उघटता
सर्वत्र पसरत
शोधले तुला मी
या चारी दिशाही
तु मात्र आहेस
चांदण्या रात्रीत
पुन्हा का मिटावे
हे डोळे अलगद
तु मात्र आहेस
माझ्या मिठीत
स्वतःस विसरुन
माझ्या जगात..

मागणं

बरंचस आता
या मनातच राहिल
तु निघुन गेलीस
मन तिथेच राहिल
तुझा विरह असेल
माझ दुखः ही
ते फक्त आता
डोळ्यातच राहिलं
तुटलेत पाश सारे
तुझ्या आठवणींचे
हे सावरायला इथे
कोणचं ना राहिलं
भेट त्या वाटेवर
पुन्हा एकदा व्हावी
पोरक्या प्रेमाचं
मागनं एवढचं राहिलं

.

शाळा

एक दिवस असेल तो
मला पुन्हा जगण्याचा
लहानपणीच्या आठवणीत
पुन्हा एकदा रमण्याचा
शाळेतल्या बाकड्यावर
पुन्हा जाऊन बसण्याचा
मित्रांसोबत एकदा
दंगा मस्ती करण्याचा

एक दिवस असेल तो
पाऊसात भिजण्याचा
आजारी पडलो म्हणुन
शाळा बुडवण्याचा
गृहपाठ केला नाही म्हणुन
छडी खाण्याचा

एक दिवस असेल तो
सहलीला जाण्याचा
मित्रांसोबत मस्ती करण्याचा
आईने दिलेल्या डब्यातील
बटाट्याची भाजी खाण्याचा

एक दिवस असेल तो
मैदानावर दंगा करण्याचा
चेंडु गेला म्हणुन
खेळ थांबण्याचा
नक्की जिंकल कोण?
याचा अंदाज लावण्याचा

एक दिवस असेल तो
शाळेची घंटा वाजण्याचा
शाळा सुटली म्हणुन
पळत घरी जाण्याचा
मस्त सगळ आवरुन
अभ्यासाला बसण्याचा

एक दिवस असेल तो
शाळा कायमची सुटण्याचा
आठवणीतल्या शाळेत
दिवस तो जगण्याचा
पुन्हा शाळेत घेऊन जाण्याचा
पुन्हा मित्र भेटण्याचा
दंगा मस्ती करण्याचा
मधल्या सुट्टीत ….

मन

तुटलेल्या मनाला आता
दगडाची अभेद्यता असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी
शब्द आहेत आठवणीतले
त्यास एक वाट असावी
राहुन गेली वचने सारी
मनास ना खंत असावी
धुसर त्या क्षणांमध्ये
अबोल सारी चित्रे असावी
अस्पष्ट त्या प्रेमास आज
नात्याची ओळख असावी
भटकणार्‍या मनास एक
हक्काची जागा असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी