मन

शब्दांची गरज नाहीये
नातं समजण्या साठी
भावना महत्वाची
समजलं तर आकाश छोटे
सामावले तर जगही कमी पडेल
नातं जपण्यासाठी
अशी व्यक्ती असावी मज पाशी
ही एकचं ओढ त्यासाठी
भुतकाळात अडकलेल्या
गरज आहे आजच्या हाकेची
ओढुन आपल्या मिठीत घेण्याची
जाऊच नये बंध तोडुन
पुन्हा गरज आहे त्या बंधनाची
नातं जपण्याची
सगळं विसरून आपलस करण्याची
चुक ती विसरण्याची
बोलणार्‍या नात्यांना
साद देण्याची
मनमोकळं एकदा बोलण्याची
अगदी भांडण्याची
डोळ्यांची कडा पुसण्याची
गरज आहे ती
नातं फुलवायची
नातं जपण्याची
अगदी मनापासून. ..

Advertisements

माहितेय मला

माहितेय मला
तु माझी नाहीस
माझ्या स्वप्नातली
आयुष्यात नाहीस
दुरवर उभा मी
वाट पहात तुझी
माहितेय मला
तु येणार नाहीस
पण तरीही हट्ट
तुझ्या आठवणींचा
डोळ्यातील आसवांचा
निराश या वाटेचा
माहितेय मला
तुला हे कळणार नाही
कधी मंद प्रकाशात
कधी पाऊसात
माझ्या कवितेत ही
माहितेय मला
तुला मी विसरणार नाही
– योगेश खजानदार

प्रेम

सतत तिच्या विचारात राहणं
तिच्या साठी चार ओळी लिहणं
लिहुनही ते तिलाच न कळनं
यालाच प्रेम म्हणतात का?

न राहुनही तिला बघावं
डोळ्यात मग साठवावं
अश्रु मध्ये दिसावं
यालाच प्रेम म्हणतात का?

रोजच्या वाटेकडे पहावं
ति येईल हे कळावं
पाहुनही न पहावं
यालाच प्रेम म्हणतात का?

तिने सहज निघुन जावं
हळुच मागे वळून पहावं
मग मंद हसावं
यालाच प्रेम म्हणतात का?

मग दिसेनासं व्हावं
हे प्रेम ह्रदयात रहावं
आठवणींत जगावं
यालाच प्रेम म्हणतात का?

अखेर

एकांतात राहशील ही तु
बुडत्या सुर्याकडे पहाणार
तो मी नसेल

मोकळेपणाने कधी
हशील ही तु
पण हसवणारा मी नसेल

त्या वाटेवर पुन्हा
चाललीस जरी तु
पण सोबतीला तुझ्या मी नसेल

चांदण्या रात्री
पाहशील जरी वर तु
त्या चांदण्यात मी नसेल

पुन्हा फिरुन
मागे पाहाशील ही तु
थांबलेला तो मी नसेल