परिवर्तन

खुप काही घडाव
नजरेस ते पडाव
मला काय याचे
मौन असेच राहणार

सत्य समोर इथे
बोलेल कोण ते
शांत आहेत ओठ
भिती अशीच राहणार

का सहन करावी
जुलुम कात काढावी
हात हे खोलुन
विरोध असेच राहणार

मी एक सामान्य
सामान्य की असमान्य
भिरकावून हे अन्याय
परिवर्तन असेच होत राहणार

-योगेश खजानदार

Advertisements