तुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी
तुझी आणि माझी मैत्री
ऊन्ह आणि सावली जणु
सतत सोबत असताना
साथ न सोडणारी
तुझी आणि माझी मैत्री
मन आणि भावना जणु
मी न बोलताही
सगळे समजुन घेणारी
तुझी आणि माझी मैत्री
गीत आणि सुर जणु
मधुर शब्दांच्या साथीने
जीवन सुंदर करणारी
– योगेश खजानदार