भारत माता

करतो नमन मी
माझ्या भारत मातेला
धुळ मस्तकी
जणु लावूनी टीळा
थोर तुझी किर्ती
किती सांगु सर्वांना
इतिहास आज
सुवर्ण अक्षरी लिहिला
घडली क्रांती
झुगारून अन्यायाला
शहीद झाले अनेक
स्वातंत्र्य मिळवायला
करतो नमन मी
माझ्या भारत मातेला
– योगेश खजानदार

-योगेश खजानदार

Advertisements

बाबा

बाबा मनातल थोडं
आज सांगायचं आहे
बस जरा थोडा वेळ
तुझ्याशी बोलायच आहे

किती कष्ट करशील
हा संसार चालवशील
माझ्या सुखासाठी का
दिनरात राबशील

दोन घटका स्वतःसाठी
कधी न राहशील
माझ्या स्वप्नांना
तुझ्या डोळ्यांत पाहशील

काटकसर करून
मला भरपूर देशील
स्वतः साठी मात्र
काही न घेशील

रात्री उशिरा घरी
सकाळी लवकर जाशील
आपली भेट न होताच
दिवस असेच जातील

बाबा तुझ्या कष्टाचे
स्वप्न पुर्ण होतील
मी जे घडलो
घडविणारा तु होशील

बस जरा बाबा
थोड बोलायचं आहे

-योगेश खजानदार

एक कविता

आज अचानक मला
आठवणीचे तरंग दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसले

दुरावलास तु नकळत
व्यर्थ ते कारण दिसले
कळता मझ चुक ही
किती हे काळ दिसले

आज ही तु अधुरा
मझ मी अधुरी दिसले
अमाप प्रेम हे मनी
आज हे डोळ्यात दिसले

मझ मी न राहीले
तुझेच रूप दिसले
प्रवासातील आपण दोघे
आज मी एकटीच दिसले
– योगेश खजानदार

-योगेश खजानदार

जीवन

माहितेय मला जीवना
अंती सर्व इथेच राही
मोकळा हात अखेर
मोकळाच राही
जीवन तुझे नाव ते
संपूर्ण होऊनी
अखेर शुन्य राही
जीवन आता बोलते
हळुच ओठात हसते
पुन्हा काय बोलते
ऐक तु मानवा
अंत फक्त तुझाच होई
विचार मात्र तुझेच राही
कमाव असे विचार जे
अंती फक्त तुझेच राही
– योगेश खजानदार

-योगेश खजानदार

हे धुंद सांज वारे

हे धुंद सांज वारे
बेधुंद आज वाहे
सखे सोबतीस
मनी हुरहुर कारे

मी बोलता अबोल
शब्द तेही व्यर्थ
समजुन हे इशारे
लगबग तुझ ती कारे

मावळतीस सुर्य
लालबुंद जरा तांबुस
वाट पाहतो कुणी
त्याला ही घाई कारे

नको मझ विरह
तुझं ओढ परतीस
वचन हे इथेच
पुन्हा भेटशील कारे
– योगेश खजानदार

नकळत तेव्हा कधी

नकळत तेव्हा कधी
चुक ती झाली होती
प्रेम झाल अचानक
जेव्हा ती लाजली होती

ठरवल होत तेव्हाच
आपल्याला हीच पाहिजे होती
कस विचारू तिला
जेव्हा ती अनोळखी होती

मैत्री पासुन सुरूवात
पुन्हा खास जमली होती
विचारुन टाकतो तिला
जेव्हा ती जवळ होती

मन बोललं थाब जरा
वेळ चुकीची होती
सोबत तिच्या कोणीतरी
जेव्हा ती येत होती

खुप काही विचारलं
माझ्याशी ती बोलत होती
मी मात्र हरवुन गेलो
जेव्हा ती समोर होती

मन तुटल प्रेम मनातच
आठवणीत ती राहत होती
आपल्या विश्वात रममाण
जेव्हा ती चालली होती

कसे समजावे मनाला
ती जे बोलली होती
मन झाले आनंदी
जेव्हा ती खुश होती

नकळत तेव्हा कधी
चुक ती झाली होती
– योगेश खजानदार

वेड मन

रोज मन बोलत
आज तरी बोलशील
रुसलेल्या तिला
कशी आहेस विचारशील

भांडलो आपण
आता विसर म्हणशील
डोळ्यातील आसवांना
वाट करुन देशील

मन तस वेडसर
आठवणीत राहशील
का भांडलीस माझ्याशी
असा जाब विचारशील

सोड सगळं आता
घट्ट मिठी मारशील
पुन्हा नाही भांडणार
अस वचन देशील

रोज मन बोलत
आज तरी बोलशील