काजळ

आठवणींचा दिवा
मनात पेटता जणु
प्रेमाच्या या घरात
प्रकाश चहूकडे

भिंतीवरी सावली
चित्र जणु चालती
पाहता मी एकटी
डोळे ओलावले

झुळूक ती मंद
घर माझे अंधारुन
दिवा हा विझवून
काजळ जणु साचले
– योगेश खजानदार

Advertisements